Brain Eating Amoeba Canva
लाईफस्टाईल

Brain Eating Amoeba: केरळात मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; काय आहेत धोकादायक आजाराची लक्षणे?

Brain Disease: केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे,यात एका ५ वर्षीय चिमुकलीचा दुर्मिळ संसर्ग झाल्याने मृत्यू झाला आहे. तिला ला प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेप्लाइटिस संसर्ग झाला होता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे,यात एका ५ वर्षीय चिमुकलीचा दुर्मिळ संसर्ग झाल्याने मृत्यू झाला आहे. तिला ला प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेप्लाइटिस संसर्ग झाला होता. त्यामुळे तिला ताप आणि उलट्या या सारखी लक्षणे वारंवार दिसून येत होती. वैद्यकिय तपासणीत अमीबिक मेनिंगोएन्सेप्लाइटिस हा संसर्ग झाल्याचे आढळून आले.

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यामध्ये 'अमीबिक मेनिंगोएन्सेप्लाइटिस' या रोगाची लागण झालेल्या पाच वर्षाच्या मुलीचा आखिर मृत्यू झाला आहे. दूषित पाण्यात आढळून येणारे फ्रि- लिविंग अमिबा या विषाणूमुळे मेंदूचा दुर्मिळ संसर्ग व्यक्तिला होतो. ज्या व्यक्तीला मेंदूचा संसर्ग होतो,त्यात अमिबा व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे खातो. व्यक्तीला झालेल्या या आजाराची मुख्य लक्षणे म्हणजे ताप, डोकेदुखी आणि उलट्या तसेच चक्कर येणे इत्यादी आहेत. याआधी अलपुझा जिल्ह्यामध्ये २०२३ आणि २०१७ मध्ये हा आजार आढळून आला होता.

मून्नियुर पंचायत विभागात वास्तव्यास असलेल्या मुलीचा सोमवारी रात्री कोझिकोड मेडिकल कॉलेज आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थमध्ये मृत्यू झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मृत मुलीला वैद्यकीय (Medical)महाविद्यालयात दाखल करुन एका आठवड्याच्यावर झाले होते.

अमिबा हा दूषित पाण्यातून तिच्या नाकावाटे मृत मुलीच्या शरीरात पोहचला,त्यामुळे तिच्या संपूर्ण शरीरात संसर्ग पसरला. मृत्यूच्या काही दिवसाआधी मुलगी गावातील एका तलावात गेली होत. त्यानंतर तिला ताप ,डोकेदुखी आणि उलट्याचा त्रास होऊ लागला. आखिर १० मे रोजी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत मुलीसह त्यादिवशी तलावात गेलेल्या काही मुलांनाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली मात्र त्यांना कोणताही संसर्ग नसल्याचे आढळून आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

कुठे आढळतो?

अमीबिक मेनिंगोएन्सेप्लाइटिस हा विषाणू गोड्या पाण्यात तसेत मातीमध्ये आढळतो. पंरतू अस्वच्छ ठिकाणी हा विषाणू मोठ्या प्रमाणात आढळतो. हा एक मेंदूच्या संसर्गाचा दुर्मिळ प्रकार आहे. व्यक्तीच्या नाकातून शरीरात प्रवेश करतो. त्यानंतर व्यक्तीच्या मेंदूपर्यंत (brain)पोहोचतो आणि मेंदू खालया सुरुवात करतो. यासंपूर्ण विषाणूमुळे मेंदूला सूज येते, मात्र यावर वेळेवर उपचार न झाल्यास व्यक्तीचा जीवही जावू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे शहरातील औंध भागात बिबट्याची एन्ट्री

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींच्या मागे नको त्या कटकटी मागे लागण्याची शक्यता, वाचा राशीभविष्य

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

Local Body Election : स्थानिक निवडणुकीत आता 'साडी पॅटर्न'; अवघ्या महिलांची 40 रुपयावर मतदारांची बोळवण, VIDEO

SCROLL FOR NEXT