Brain-Eating Amoeba :कोरोनानंतर मेंदू खाणाऱ्या अमिबाचं संकट; अमेरिकेत एकाचा मृत्यू,नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

अमेरिकेतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
Brain-Eating Amoeba
Brain-Eating AmoebaSaam TV

America News : संपूर्ण जग कोरोना महामारीतून आता कुठे बाहेर पडतंय तोच एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेत मेंदू खाणाऱ्या अमिबा या विषाणूचा प्रादूर्भाव वाढला आहे. एका व्यक्तीचा या आजाराने मृत्यू देखील झाला आहे. यामुळे अमेरिकेतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या आधी फेब्रुवारीमध्ये शार्लोट काउंट येथे एक व्यक्ती या आजाराने दगावली होती. (Latest America News)

मेंदू खाणाऱ्या या विषाणूला नैग्लेरिया फॉलेरी असंही म्हणतात.दक्षिण कोरियामध्येही या आजाराने एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. मृत्यू होण्याआधी हा व्यक्ती थायलंड येथून परतला होता. फ्लोरिडा आरोग्य विभागाचे प्रेस सेक्रेटरी जे विल्यम्स यांनी या बाबत म्हटले आहे की, या संसर्गाविषयी जाणून घेण्यासाठी महामारी शास्त्रज्ञांची एक टीम तपास काम करत आहे. दगावलेल्या व्यक्तीला मेंदू खाणाऱ्या अमिबामाचा आजार झाला होता,असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

Brain-Eating Amoeba
Sofia Ansari : हाय ये जवानी! सोफियाचा किलर लूक पाहून तुमच्याही काळजाचं होईल पाणी पाणी

मेंदू खाणाऱ्या आजारापासून दूर राहण्यासाठी आरोग्य संस्थांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. हा आजार रोखण्यासाठी स्वच्छ पाणी प्यावे. नळाचे पाणी थेट न पिता ते उकळवून प्यावे. पाणी फिल्टर असल्यासं आरोग्यासाठी ते फायद्याचे आहे, असं आरोग्य आधिकारी जे विलियम्स यांनी सांगितलं आहे. विलियम्स यांनी पुढे म्हटलं आहे की, काही व्यक्ती थेट नळावर हाताच्या सह्याने पाणी पितात. यामुळे या रोगाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढू शकतो.

Brain-Eating Amoeba
Nagpur Crime: अल्पवयीन मुलीने युट्यूब व्हिडिओ पाहून स्वत:ची केली प्रसूती; नंतर बाळासोबत जे केलं ते भयंकरच...

डोकं खाणारा अमिबा आहे तरी कसा?

नैग्लेरिया फॉलेरी म्हणून अमिबाला ओळलं जातं. हा एक पेशी जीव आहे. त्यामुळे त्याला अमिबा देखील म्हटलं जातं. हा विषाणू गरम आणि गोड पाण्याच्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतो. झरा, नदी येथील पाणी काही अंशता गरम असते मात्र हे पाणी गोड असल्याने येथे हा विषाणू हमखास असतो.

माणसांवर कसा होतो परिणाम?

अमिबा संपर्कात आल्यावर पाणी पिताना त्या पाण्यातून नाही तर श्वासातून तो नाकात प्रवेश करतो.त्यानंतर नाकावाटे डोक्यापर्यंत पोहचतो. हा विषाणू शरीरातील लाल रक्त पेशी कमी करतो. यामुळे मेंदूला सूज येते. सूज वाढल्यावर व्यक्ती दगावतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com