Air Pollution BMC Guideline Saam TV
लाईफस्टाईल

Air Pollution BMC Guideline : मुंबईची 'हवा' बिघडली, प्रदूषण रोखण्यासाठी सरकारच्या गाइडलाइन्स, काय काळजी घ्याल?

Air Pollution Side Effects : खराब हवेच्या गुणवत्तेमुळे नागरिकांना मास्क घालण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे.

कोमल दामुद्रे

BMC Guideline For Air Pollution :

वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांना श्वसनाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हवेतील विषारी धुळीच्या कणांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अशातच राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग खात्याने रविवारी महत्त्वपूर्ण आरोग्य सल्ला जारी केला आहे.

AQI च्या पातळींबाबत जागरुक राहाण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे. तसेच खराब हवेच्या गुणवत्तेमुळे नागरिकांना मास्क घालण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील काही आठवड्यांपासून हवेच्या खराब गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईत AQI हा २०० पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

अॅडव्हायझरीनुसार, मुंबईसह महाराष्ट्रातील १७ शहरे ज्यांनी उच्च AQI पातळी नोंदवली आहे. तसेच वायूप्रदूषणामुळे (Air Pollution) अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य (Health) विभागाने सर्व जिल्ह्यांना वायू प्रदूषणांचा सामना करण्यासाठी आराखडा आखण्यात आला आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये आप्तकालीन वॉर्डमध्ये श्वसनाचे विकार किंवा कोरोनरी स्थितींच्या प्रकरणांवर देखरेख ठेवण्यासाठी काही योजना आखल्या आहेत. यामुळे आजार आणि त्यासंबधित मृत्यूचा आकडा नोंदवता येईल.

1. BMC ने जारी केलेल्या गाइडलाइन्स

  • आरोग्य विभागाने खराब हवेच्या गुणवत्तेमुळे नागरिकांना सकाळी आणि संध्याकाळी मॉर्निंग वॉक, धावणे, जॉगिंग आणि मोकळ्या हवेत व्यायाम (exercise) करणे टाळा.

  • तसेच सकाळी आणि संध्याकाळी गरज नसल्यास उशिरापर्यंत खिडक्या न उघडण्याचा सल्ला दिला आहे.

  • श्वासोच्छवास, चक्कर येणे, खोकला, छातीत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, डोळ्यांची जळजळ होत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • लहान मुले आणि गर्भवती महिलांनी घराबाहेर पडताना मास्क घालण्याचे आव्हान केले आहे.

  • तसेच कपडा, रुमाल किंवा स्कार्फ हवेतील प्रदूषणापासून संरक्षण देत नाही. असे देखील सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : ठाकरेंची अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती, शिंदेंची शिवसेना एकाकी, रायगडचे राजकारण तापलं

Pune Crime: पुणे हादरलं! १८ वर्षीय प्रेयसीवर चाकूने हल्ला, प्रेमाचा थरारक शेवट

Honeymoon Destinations: लग्नानंतर हनिमूनसाठी महाबळेश्वर, माथेरान कशाला? भारतातली ही खास अन् शांत ठिकाणं ठरतील बेस्ट

Punha Shivajiraje Bhosle Collection : 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा हाऊसफुल, वीकेंडला कमाई किती?

नाशिकमध्ये राजकीय भूकंप! दोन बड्या नेत्यांची शरद पवार गटातून हकालपट्टी, भाजपचं कमळ हाती घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT