Bird Flu Saam tv
लाईफस्टाईल

Bird Flu : बर्ड फ्लूमुळे पुन्हा चिंता वाढली, सर्दीसारखी सुरुवात, वेळीच ओळखा सामान्य वाटणारी लक्षणे

Health Alert : दिल्ली प्राणीसंग्रहालयात बर्ड फ्लू (H5N1)चा रुग्ण आढळला आहे. पक्ष्यांमध्ये तपासणी सुरू असून प्रशासनाने सुरक्षेची उपाययोजना कडक केली आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Sakshi Sunil Jadhav

मागील काही दिवसात दिल्लीमधील प्राणीसंग्रहालयात बर्ड फ्लू (H5N1)चा एक रुग्ण आढळला. त्यामुळे काही पक्ष्यांमध्ये या विषाणूची तपासणी झाली असून प्रशासनाने आता सुरक्षेचे उपाय वाढवले आहेत. बर्ड फ्लू हा आजार पक्ष्यांना प्रभावित करणारा विषाणूजन्य असला तरी कधीकधी तो मानवांपर्यंतही पोहोचू शकतो.

त्यामुळे प्राणीसंग्रहालयातील कामगार, कुक्कुटपालनात काम करणारे लोक किंवा संक्रमित पक्ष्यांच्या थेट संपर्कात येणाऱ्यांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. यापूर्वी २०१६ मध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती, त्यावेळी ७० हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला होता.

तज्ज्ञांच्या मते, मानवांमध्ये बर्ड फ्लूचा प्रसार अत्यंत क्वचित आढळतो. हा आजार थेट धोकादायक नसतो, तरीही त्याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. हा विषाणू संक्रमित पक्ष्यांच्या मृतदेहांच्या संपर्कातून, श्वसनमार्गाद्वारे किंवा विष्ठेद्वारे पसरू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला या आजाराचा संसर्ग झाला तर त्याची सुरुवात सामान्य सर्दीसारखी दिसते. जास्त ताप, खोकला, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखी आणि स्नायू दुखणे अशी लक्षणे दिसू शकतात.

डॉक्टर सांगतात की, पक्ष्यांच्या थेट संपर्कापासून दूर राहणे, वारंवार हात स्वच्छ करणे आणि आजारी पक्ष्यांच्या जवळ जाणे टाळणे हे सर्वात प्रभावी सुरक्षा उपाय आहेत. प्राणीसंग्रहालयातील परिस्थिती गंभीर असली तरी सामान्य लोकांसाठी धोका मर्यादित आहे. तथापि, सावधगिरी बाळगणे, सतर्क राहणे आणि लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंत्री छगन भुजबळ यांच्या महाएल्गार मेळाव्याला धनंजय मुंडे राहणार उपस्थित

Gold Rate: १ Kg सोन्याच्या किंमतीत खासगी विमान, प्रसिद्ध बिझनेसमनच्या पोस्टने भुवया उंचावल्या, पाहा नेमकं गणित मांडलं कसं?

KBC 17: बिग बींचा अपमान करणाऱ्या मुलाला 'या' गायिकेचा सपोर्ट; म्हणाली, तो फक्त उत्साहात...

Navpancham Rajyog: आज रात्रीपासून 'या' ३ राशी होणार मालामाल; शुक्र ग्रह बनवणार पॉवरफुल योग

बॉयफ्रेंडसोबत मध्यरात्री भांडण, महिलेने विहिरीत उडी मारली, तिघांचा मृत्यू, नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT