masoor dal for weight loss
masoor dal benefitssaam tv

Masoor Dal : आरोग्यासाठी मसूर डाळीचे पाणी का आहे सर्वोत्कृष्ट? जाणून घ्या फायदे

Weight Loss Diet : मसूर डाळीचे पाणी वजन कमी करण्यासाठी, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते. फायबरयुक्त घटकांमुळे शरीर शुद्ध होते आणि चरबीचे विघटन होते.
Published on
Summary
  1. मसूर डाळीचे पाणी वजन कमी करण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

  2. फायबरयुक्त असल्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि पचन सुधारते.

  3. नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून शरीरातील घाण व विषारी घटक बाहेर टाकते.

  4. दररोज सेवन केल्यास ऊर्जा, वजन नियंत्रण आणि पचन स्वास्थ्य राखण्यास मदत होते.

भारतीय आहारामध्ये विविध डाळींचा समावेश केला जातो. त्यातच मसूर डाळीचा समावेश केला जातो. डाळीचा आहारात केल्याने तुमचे वजन कमी होते. इतकेच नाही तर बद्धकोष्ठतेचा त्रास सहज नियंत्रणात येतो. पुढे आपण याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

हिरव्या मसूर डाळीपासून तयार केलेले पाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. हे पाणी केवळ शरीराला ऊर्जा देत नाही, तर वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरते. मसूर डाळ नैसर्गिक डिटॉक्सिफायिंग एजंट म्हणून काम करते आणि शरीरात साचलेली घाण बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे पचन सुधारते, चरबीचे विघटन म्हणजेच फॅट लॉस होतो.

masoor dal for weight loss
Thane Tourism : महाबळेश्वरपेक्षा सुंदर! ठाण्यापासून अवघ्या ६७ किमीवरचं Hidden हिल स्टेशन

तज्ज्ञांच्या मते, मसूरडाळीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास चरबी चयापचय वेगाने कार्य करते. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. याशिवाय, यात असलेल्या फायबरने पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त खाण्याची सवय कमी करते. त्यामुळे पचन व्यवस्थित राहते आणि वजन वाढण्यापासून बचाव होतो.

masoor dal for weight loss
Kumbha Rashi : कुंभ राशीला आज संकाटाचा सामना करावा लागेल का? जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण भविष्य

हे पाणी बद्धकोष्ठतेवरही प्रभावी मानले जाते. फायबरयुक्त घटकांमुळे मल मऊ होतो आणि आतड्यांची हालचाल सुधारते. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात. एकूणच, मसूर डाळीचे पाणी हे वजन कमी करणे, बद्धकोष्ठतेपासून मुक्ती आणि पचन सुधारण्यासाठी उत्तम नैसर्गिक उपाय ठरतो. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हे पाणी आहारात समाविष्ट करणे फायदेशीर मानले जाते.

Q

मसूर डाळीचे पाणी दररोज घेणे सुरक्षित आहे का?

A

दररोज योग्य प्रमाणात मसूर डाळीचा आहार घेतल्यास आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

Q

मसूर डाळ शरीर शुद्धीकरणासाठी कशी मदत करते?

A

मसूर डाळ नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे. हे शरीरातील साचलेले विषारी घटक बाहेर काढून शरीर शुद्ध करण्याचे कार्य करते.

Q

मसूर डाळीचे पाणी बद्धकोष्ठतेवर फायदेशीर का आहे?

A

मसूर डाळीत फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने मल मऊ होतो. आतड्यांची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com