Summer mehendi for hair google
लाईफस्टाईल

Mehendi Hair Pack: उन्हात सतत येणाऱ्या घामामुळे केस खराब झालेत? मग मेहेंदीत मिसळा 'हा' पदार्थ, केसांची समस्या होईल छुमंतर

Henna Hair pack For Summer: मेहेंदी लावल्याने केस काळे भोर, सुंदर आणि चमकदार होतात. मेहेंदीचा वापर उन्हाळ्यात खूप फायदेशीर ठरतो. तसेच केसांच्या अनेक समस्या सुद्धा कमी होतात.

Saam Tv

उन्हाळा सुरु झाल्यावर शरीसोबत केसांमध्ये सुद्धा घाम यायला सुरुवात होते. घामामुळे केसांचा वास येतो आणि केसांची वाढ थांबते. उन्हाळ्यात तुम्ही केस मोकळे ठेवलेत तर तुमचे केस गळतात. अशा वेळेस तुम्ही मेहेंदीचा वापर करून तुमच्या केसांची शोभा वाढवू शकता. केसांना मेहेंदी लावल्याने अनेक फायदे मिळतात. (Hair care Tips) तसेच केस नैसर्गिक साहित्याचा वापर करून सुंदर दिसतात. पुढे आपण केसांना मेहेंदी लावल्याने मिळणारे फायदे आणि मेहेंदी लावण्याची योग्य पद्धत जाणून घेऊ.

मेहेंदी लावण्याचे फायदे

बऱ्याच महिला पांढरे केस दिसायला लागले की मेहेंदीचा वापर करतात. मेहेंदी लावल्याने केस काळे भोर, सुंदर आणि चमकदार होतात. शिवाय डोक्याला थंडावा मिळतो. मेहेंदीमध्ये केमिकल्सचा वापर केला जात नाही. त्यामुळे केसांना कोणतीही हानी होत नाही. शिवाय केस मोकळे ठेवणेही शक्य होते. मात्र मेहेंदीत काही विशिष्ट गोष्टींचा वापर केल्याने तुमचे केस दाट होऊ शकतात. (Henna/ Mehndi Hair pack to stop hairfall & get long hair)

मेहेंदी कशी भिजत घालावी?

सगळ्यात आधी १ कप मेहेंदी पावडर घ्या. त्यामध्ये आवळा पावडर, १ चमचा ब्लॅक कॉफी मिक्स करा. पुढे त्यामध्ये कोरा चहा (साखर नसलेला) आणि आवश्यकतेनुसार कोमट पाणी मिक्स करा. आता एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. मेहेंदीमध्ये पावडरच्या गाठी होऊ देऊ नका. (Beauty Tips) तुमचे मिश्रण तयार आहे.

मेहेंदी केसांना लावताना कोणती काळजी घ्यावी?

आता हे मिश्रण तुम्ही रात्रभर झाकण लावून ठेवून द्या. असे केल्याने मेहेंदीमधला रंग पुर्णपणे बाहेर पडतो आणि जास्त काळ टिकतो. मेहेंदी लावताना दुपारची वेळ निवडा. त्याने तुमचे डोके शांत होईल. जेव्हा तुम्ही मेहेंदी लावाल तेव्हा त्यामध्ये एक पदार्थ मिसळा. मेहेंदीच्या पेस्टमध्ये १ चमचा इंडिगो पावडर आणि १ चमचा लिंबाचा रस मिक्स करा. केसांना समान रंग लावा. पॅक २ ते ३ तास ठेवा. मग साध्या पाण्याने केस ,स्वच्छ धुवून घ्या. तर १ दिवसानंतर तुम्ही शॅम्पूने केस धुवू शकता.

Edited By: Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT