Sabudana Recipes: उपवासाला साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळलात? मग एकदा 'ही' चटपटीत रेसिपी करून पाहाच

Sabudana Khichdi Recipes: उपवासाला रोज साबुदाण्याची खिचडी खाल्ली जाते. याचं एक कारण म्हणजे साबुदाण्याची खिचडी एकदम सोपी रेसिपी आहे. पण तुम्हाला माहितीये का? साबुदाण्याचे काही चटपटीत पदार्थ आहेत. जे तुम्ही अगदी कमी वेळात तयार करू शकता.
Sabudana Khichdi Recipes
Sabudana Recipesgoogle
Published On

हिंदू धर्मात दर महिन्याला संकष्टी किंवा काही ठरावीक वारांना उपवास केला जातो. उपवाला अनेक गृहीणी साबुदाण्याचे पदार्थ तयार करतात. त्यामध्ये साबुदाण्याची खिचडी आवर्जून खाल्ली जाते. पण तुम्हाला काही चटपटीत आणि झटपट होणारे पदार्थ खायचे आहेत का? तुम्हाला माहित नसेल पण साबुदाण्यापासून अनेक कुरकुरीत, चटपटीत, मऊ लुसलुशीत पदार्थ तयार केले जातात. चला तर जाणून घेऊ रेसिपी आणि पदार्थांची नावे.

Sabudana Khichdi Recipes
Coconut Chutney Recipe: घरच्या घरी साऊथ इंडियन स्टाईल इडली सांबार चटणी कशी बनवायची? जाणून घ्या रेसिपी

साबुदाणा खिचडी रेसिपी

भिजवलेले साबुदाणे घ्या. आता एका कढईत तेल तापवा. त्यामध्ये जीरे आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता घाला. त्यानंतर उकडलेला बटाटा बारिक चिरून परतून घ्या. २ ते ३ मिनिटांनी त्यामध्ये साबुदाणे मिक्स करून छान परतून घ्या. ५ मिनिटांनी त्यात मीठ आणि कोथिंबीर टाकून खिचडी सर्व्ह करा.

साबुदाणा टिक्की

भिजवलेले साबुदाणे घ्या. बटाटे उकडून घ्या. आता साबुदाणे, बटाटे, शेंगदाणे, हिरवी मिरची, मसाले, मीठ हे मिश्रण एकत्र करून पीठ मळून घ्या. त्यामध्ये पाण्याचा वापर करू नका. आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून टिक्कीचा आकार द्या. आता तेलात फ्राय करून टिक्की सर्व्ह करा.

साबुदाणा खीर

२ ते ३ तास साबुदाणे भिजवून घ्या. त्याचसोबत एका भांड्यात दूध उकळवून घ्या. आता उकळेल्या दूधात साबुदाणे मिक्स करून शिजवून घ्या. थोड्या वेळाने त्यामध्ये साखर आणि एक चमचा तूप मिक्स करा. ५ते ६ मिनिटांनी गॅस बंद करून खिर सर्व्ह करा.

साबुदाणा वडा

साबुदाणा वडा हा उपवासाला परफेक्ट चटपटीत पदार्थ आहे. त्यासाठी भिजवलेले साबूदाणे घ्या. सोबत शेंगदाण्यांचा कुट आणि उकडलेला बटाटा घ्या. आता तुम्ही साबुदाणे, शेंगदाण्यांचा कुट, हिरवी मिरची, जीरे, मीठ हे साहित्य मिक्स करून पीठ तयार करा. पीठाचे छोटे गोळे करून वड्यांचा आकार द्या. पीठ व्यवस्थित मिक्स करता येत नसेल तर आणखी बटाट्याचा वापर करू शकता. आता एका कढईत तेल गरम करा. त्यामध्ये वडे मिक्स करून छान गरमा गरम कुरकुरीत वडे सर्व्ह करा.

Edited By: Sakshi Jadhav

Sabudana Khichdi Recipes
UPI Latest Update: UPI युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! तुमचा मोबाईल नंबर बंद झालाय? तर 'हे' काम लगेच करा, अन्यथा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com