Saam Tv
साऊथ इंडियन अन्ना स्टाईल चटणी बनवण्यासाठी पुढील सोप्या टिप्स फॉलो करा.
किसलेले ओले खोबरे, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, आलं, लाल बेडगी मिरची, हिंग, तेल, उडदाची डाळ, कडीपत्ता, मोहरी चणे इ.
खोबरं, कोथिंबीर, मिरची, चणे, आलं यांचे वाटण करा.
तुम्ही या मिश्रणात चिंचेचा कोळ सुद्धा मिक्स करू शकता.
आता तुम्ही वाटण एका भांड्यात काढून घ्या.
फोडणीची तयारी करायला घ्या.
तेल, जीरे, उडदाची डाळ, कढीपत्ता, मोहरी, लाल बेडगी मिरची, हिंग इत्यादी साहित्याची फोडणी द्या.
आता संपुर्ण फोडणी चटणीच्या भांड्यात घाला आणि छान मिक्स करा.
आता तयार चटणी गरमा गरम इटली डोसासोबत सर्व्ह करा.