Nashik Tourist Places SAAM TV
लाईफस्टाईल

Nashik Tourist Places : लाँग वीकेंडसाठी नाशिकला जाताय? मनाला भुरळ पाडणाऱ्या 'या' ठिकाणांना भेट द्या, रिलॅक्स व्हाल!

Long Weekend Plan : मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून रिलॅक्स व्हायला लाँग वीकेंड प्लान करत असाल तर, नाशिक बेस्ट लोकेशन राहील. नाशिक जवळील अनेक निसर्गरम्य ठिकाणे पाहून तुम्ही फ्रेश व्हाल आणि तुमचा मूड आनंदी होईल.

Shreya Maskar

आजपासून ते १९ तारखेपर्यंत वीकेंडसाठी सुरू झाली आहे. अजून पण तुम्ही प्लान केला नसेल तर तुम्ही नाशिकची सफर करू शकता. आपले कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत तुम्ही हा वीकेंड प्लान करू शकता. नाशिक हे महाराष्ट्रातील लोकप्रिय शहर आहे. नाशिक आणि नाशिकच्या जवळ अनेक अद्भुत आणि निसर्गरम्य ठिकाणे आहेत जी, पावसाळ्यात आणखी खुलून येतात. नाशिक शहर हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. नाशिक हे धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे.

रतनवाडी

नाशिकच्या जवळ असलेले नयनरम्य ठिकाण म्हणजे रतनवाडी होय. पावसाळ्यात याचे सौंदर्य आणखी खुलून येते. हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात सुंदर आणि मनमोहक गाव आहे. येथील दृश्य पाहून मनाला शांती मिळते. रतनवाडी हा महाराष्ट्रातील डोंगराळ भाग आहे. पावसाळ्यात ओले रस्ते आणि हिरवागार निसर्ग मनाला भुरळ पाडतो. येथील आर्थर लेक हा पर्यटकांचे आकर्षण आहे. तसेच येथे रतनगड किल्ला देखील तुम्हाला पाहायला मिळेल. ट्रेकिंगसाठी हे नाशिक मधील सर्वात उत्तम ठिकाण आहे.

सापुतारा

सापुतारा हे ठिकाण गुजरातमध्ये आहे. मात्र हे ठिकाण नाशिकपासून जवळ असल्यामुळे तुम्ही येथे आवर्जून जाऊ शकता. हे गुजरातमधील एकमेव हिल स्टेशन आहे. सापुतारा महाराष्ट्राच्या सीमेवर सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेले नयनरम्य ठिकाण आहे. येथे तुम्ही मनसोक्त फोटोशूटचा आनंद घेऊ शकता. पावसाळ्यात हा निसर्ग पाहणे स्वर्गापेक्षा कमी नाही.

डहाणू

नाशिक जवळील आणखी एक मन मोहक ठिकाण म्हणजे डहाणू. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर डहाणू वसलेले आहे. पावसाळ्यात येथील सौंदर्य आणखी खुलून येते. पावसाळ्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे आनंद लुटायला येतात. डहाणूमधील डहाणू बीच हा पर्यटकांचे आकर्षण आहे. डहाणू बीच वरून तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्ताचे मनमोहक रूप पाहू शकता.

सिल्वासा

दमण आणि दीव मधील सिल्वासा हे पर्यटकांचे आकर्षण आहे. पावसाळ्यात याचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. सिल्वासा हे पोर्तुगीज संस्कृतीतील सुंदर शहर आहे. निसर्गप्रेमींसाठी ही सुखाची मेजवानी आहे. नाशिक ते सिल्वासा अंतर सुमारे १२८ ते १३० किमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाऊबीजेच्या दिवशी सोन्याला ओवाळणी, चांदी रूसली, सुवर्णनगरीत १ तोळ्याला किती भाव? जाणून घ्या

Rohit Sharma Record : रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियात रचला इतिहास; विराट, सचिन तेंडुलकरही मागे पडले

Kalyan: दोन गटात तुफान राडा, दगडफेक- तोडफोड अन् हाणामारी; एकमेकांची डोकी फोडली; VIDEO व्हायरल

Festive Car Sales: सणासुदीच्या काळात 'या' ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: आंदोरा गावात पार पडला बळीराजा महोत्सव

SCROLL FOR NEXT