Water Crisis : नागापूर गावात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई; महिलांचा ग्रामपंचायंतीत ठिय्या

Buldhana News : उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जाऊन दिवस काढले. किमान पावसाळा सुरु झाल्यानंतर पाण्याची समस्या मिटेल अशी आशा ग्रामस्थांना होती.
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलढाणा : उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागल्यानंतर मेहेकर तालुक्यातील नागापूर येथील ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात देखील भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात देखील गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने आज संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. 

Buldhana News
Malkapur News : वस्तीत असलेले बिअर बार हटवण्यासाठी महिलांचे दुकानासमोर बेमुदत उपोषण

उन्हाळ्यात पाणी टंचाईला (Water Crisis) सामोरे जाऊन दिवस काढले. किमान पावसाळा सुरु झाल्यानंतर पाण्याची समस्या मिटेल अशी आशा ग्रामस्थांना होती. मात्र पावसाळा सुरु होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तरी पाणी मिळणे अपेक्षित होते. मात्र उन्हाळ्यात असलेली परिस्थिती कायम असल्याने वैतागून असंख्य महिलांनी ग्रामपंचायतीमध्ये (Gram Panchayat) ठिय्या आंदोलन केले. नागापूर गाव हे खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मतदार संघात येत असून नागरिकांना मूलभूत सुविधेसाठी आंदोलन करावे लागत असल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

Buldhana News
Lightning Strike : वीज कोसळून महिलेचा मृत्यू, एकजण गंभीर; गडचिरोली जिल्ह्यातील घटना, नागपुरातही मुसळधार पाऊस

जलजीवन मिशनची कामे तरीही टंचाई 

वास्ताविक पाहता नागापूर गावामध्ये जल जीवन मिशनचे कामे झाली आहेत. तरीही ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. यामुळे असंख्य महिलानी आज ग्रामपंचायतीत जाऊन पाणी देण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com