Tulsi Leaves Water Saam TV
लाईफस्टाईल

Tulsi Leaves Water : सकाळी उठल्या उठल्या प्या तुळशीच्या पानांचा रस; ब्लड-शूगरसह हे आजार होतील छूमंतर

Benefits Of Tulsi Leaves : घराबाहेर तुळशीचं झाड असून देखील त्यांना या तुळशीच्या पानांचा नेमका काय फायदा काय आहे हे माहिती नाही. त्यामुळे आज त्याचीच माहिती या बातमीमधून जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

तुळशीचं रोप प्रत्येक घराजवळ असणे गरजेचं आहे. पुजेसह याचे अनेक आयुर्वेदिक फायदे देखील आहेत. तुळशीच्या पानांमध्ये अनेक गुणकारी घटक असतात. त्यामुळे त्वचेच्या विविध समस्या, ब्ल प्रेशर, शूगर यांवर देखील कंट्रोल मिळवता येतो. अनेक व्यक्तींच्या घराबाहेर तुळशीचं झाड असून देखील त्यांना या तुळशीच्या पानांचा नेमका काय फायदा आहे हे माहिती नाही. त्यामुळे आज त्याचीच माहिती या बातमीमधून जाणून घेणार आहोत.

शरीर डिटॉक्स

तुळशीच्या पानांमध्ये असलेल्या जिवनसत्वांमुळे आपलं शरीर डिटॉक्स राहतं. तुळशीची पानं रात्रभर पाण्यात भीजत ठेवून सकाळी ते पाणी प्यावे. त्याने शरीरातील सर्व टॉक्सिन बाहेर फेकलं जातं. तुळशीचं पाणी प्यायल्याने स्किनवरील पिंपल्स सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते.

पचन क्रिया सुधारते

तुळशीच्या पाण्यात असलेले गुणधर्म आपल्या शरीरातील अॅसिडीटी कमी करते. त्यामुळे ब्लोटींग आणि गॅसच्या समस्यांवर मात करता येते. त्यामुळे ज्या व्यक्तींना हेवी पदार्थ पचत नाही त्यांनी दररोज आहारात सकाळी उठल्यावर या पाण्याचा समावेश करा.

ताण तणाव कमी होतो

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील ताण तणाव वाढत चालला आहे. तुळशीची पाने अँटी-डिप्रेसेंट आणि अँटी - ऑक्सीओटीक असते. हे गुणधर्म आपल्या मनात असलेला ताण कमी करतात. तणावात असलेल्या व्यक्तीने स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि रिलॅक्स होण्यासाठी तुळशीच्या पानांचा सरबत घ्यावा.

रक्तातील साखरेवर नियंत्रण

प्रत्येक घरामध्ये एक तरी डायबीटीजचं पेशंट आहे. काही व्यक्तींना रक्तातील साखर कमी असल्याने इंसुलिनच्या समस्या देखील उद्भवतात. अशा व्यक्तींना दर आठवड्याला किंवा महिन्याला इंसुलिन घ्यावे लागते. अन्यथा साखरेचं प्रमाण खूप जास्त वाढत. त्यामुळे अशा रुग्णांनी देखील आपल्या आहारात तुळशीची पानं किंवा या पानांचा रस प्यावा.

रोग प्रतिकारक शक्ती वाढते

पावसाळ्यात सर्दी-खोकला आणि ताप या आजारांची साथ पसरते. त्यामुळे त्यापासून आपला बचाव व्हावा यासाठी दररोज एक तरी तुळशीचं पान खाल्लं पाहिजे. कारण या पानांमध्ये रोग-प्रतिकारक शक्ती जास्त असते. त्यामुळे तुम्ही देखील आहारात याचा समावेश करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT