Hair Care SAAM TV
लाईफस्टाईल

Hair Care : केसांची वेणी बांधावी की केस मोकळे सोडावे? कशामुळे सौंदर्य टिकेल जाणून घ्या...

Hair Care Tips : आपण आपले केस कोणत्या पद्धतीनं बांधतो त्यावर केसांचं आरोग्य अवलंबून असते. केस बांधून ठेवायचे की मोकळे सोडायचे? जाणून घ्या..

Shreya Maskar

चेहऱ्याचे सौंदर्य केसांच्या मजबूतीशिवाय अशक्य असते. त्यामुळे केसांची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक महिलेला आपले केस सुंदर आणि घनदाट हवे असतात. केस मोकळे सोडल्यास केसांचे आरोग्य धोक्यात येते तर केसांची वेणी बांधल्याने केस मजबूत आणि लांबसडक होतात.

केसांची वेणी घालणे

केसांची वेणी घातल्यास केसांचा गुंता होत नाही आणि केस तुटण्याचा धोका कमी होतो. केस मोकळे ठेवल्यास केसांमध्ये गुंता वाढतो. हा गुंता सोडवताना केस मोठ्या प्रमाणात तुटतात. त्यामुळे नेहमी केस बांधून ठेवावे. मोकळे केस लवकर चिकट होतात. कारण केसांवर मोठ्या प्रमाणात धूळ आणि माती उडते. परिणामी केसांची मुळे कमकूवत होतात.

केसांचा कोरडेपणा कमी होतो

नियमित वेणी घातल्यास कोरड्या केसांची समस्या कमी होऊन केस देखील कमी तुटतात. केस बांधल्यामुळे केसांमध्ये ओलावा टिकून राहतो.

केसांची काळजी कशी घ्यावी?

  • कधीही वेणी सैल घालावी. वेणी घट्ट बांधल्यास टाळू दुखू लागतो.

  • वेणी घालण्यापूर्वी केसांना नेहमी नारळाचे किंवा बदामाचे तेल लावावे. यामुळे केसांची वाढ चांगली होते.

  • आठवड्यात २ ते ३ वेळा केसांना तेलाने मालिश करावे. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केसांना चमक राहते.

  • तेल लावून केसांची वेणी बांधल्यास टाळूचे रक्ताभिसरण सुरळीत होऊन केसांचे आरोग्य सुधारते.

  • केसांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी अन्न, पाणी आणि चांगली झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे.

रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरणे महत्त्वाचे

  • दिवसभर बाहेर असल्यामुळे केसात गुंता निर्माण होतो. तसेच रात्री झोपताना डोक्याखाली उशीचे केसांसोबत घर्षण होऊन केस तुटण्याची संख्या जास्त असते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरुन झोपावे.

  • दिवसभर केस नीट राहावे यासाठी आपण अनेक केमिकलयुक्त प्रोडक्ट्स केसांवर लावतो. उदा. हेअर स्प्रे. पण त्यामुळे केसांचे नुकसान होते. रात्री तेलाने केसांना मसाज केल्यास केस मजबूत होतात आणि केस तुटण्याचे प्रमाण कमी होते.

  • रात्री केसांचा गुंता सर्वप्रथम बोटांच्या साहाय्याने सोडवा. डायरेक्ट कंगव्याचा वापर केल्यास केस तुटण्याचे प्रमाण वाढते.

  • केसातील गुंता सुटल्यावर झोपताना सैल वेणी घालावी. यामुळे केस रात्री तुटत नाही आणि शांत झोप लागते.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टिव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत मनसेची एंट्री? मोठ्या घडामोडीची शक्यता, बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य

Kanbai Utsav : धुळ्यात कानबाई विसर्जन उत्सवात घडले दुर्दैवी; विसर्जनावेळी एकाचा बुडून मृत्यू

Ind vs Eng : DSP सिराजचा पंच! अटीतटीच्या सामन्यात भारताचा ऐतिहासिक विजय, अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी बरोबरीत

तहसील कार्यालयात दारू पार्टी; हातात दारूचा ग्लास अन् गाण्यावर ठुमके, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT