Back Pain Problem Saam Tv
लाईफस्टाईल

Back Pain Yoga : पाठीच्या दुखण्यापासून त्रस्त आहात? नियमित करा ही ५ योगासने, मिळेल आराम

Back Pain Home Remedies : बरेचदा चुकीच्या उठण्या-बसण्यामुळे आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे पाठदुखी आणि कंबर दुखीच्या समस्या उद्भवतात. या आजाराचा सर्वाधिक सामना महिला वर्गांना करावा लागतो.

कोमल दामुद्रे

Yoga For Back Pain :

बरेचदा चुकीच्या उठण्या-बसण्यामुळे आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे पाठदुखी आणि कंबर दुखीच्या समस्या उद्भवतात. या आजाराचा (Disease) सर्वाधिक सामना महिला वर्गांना करावा लागतो.

डेस्क जॉब, घरातील अतिरिक्त कामे यामुळे ही समस्या उद्भवते. याशिवाय स्नायू कमकुवत होणे, पुरेशा पोषणाचा अभाव, वाढलेले वजन, एकाच जागी अधिक वेळ उभे राहून काम केल्याने, कोणत्याही प्रकारची दुखापत या कारणांमुळे पाठदुखी (Back Pain) होऊ शकते. या समस्येवर मात करण्यासाठी काही योगासने (Yogasan) उपयुक्त ठरु शकतात. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. भुजंगासन

भुजंगासन करण्यासाठी चटई घेऊन पोटावर झोपा आणि दोन्ही तळवे छातीसमोर ठेवून जमिनीवर ठेवा. श्वास घेताना हातावर दाब देऊन पोटापर्यंत डोके वर करा. पण पोट जमिनीवरुन उचलण्याचा प्रयत्न करु नका यामुळे आराम मिळेल.

2. शलभासन

चटईवर सर्वात आधी झोपा त्यानंतर तुमचे दोन्ही पाय एकत्र करा. नंतर दोन्ही हात मांड्याखाली ठेवून पोटावर जोर देताना दीर्घ श्वास घ्या आणि दोन्ही पाय वर उचला. काही सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर श्वास सोडा आणि पाय जमिनीवर ठेवा.

3. ताडासन

ताडासन करण्यासाठी सरळ उभे राहा आणि दोन्ही हातांची बोटे एकमेकांना जोडून घ्या. त्यानंतर पायांच्या बोटांना हाताची बोटे टेकवा आणि दीर्घ श्वास घ्या. त्यानंतर पायांच्या बोटांना शक्य तितके वर खेचा. श्वास रोखून ठेवा थोड्या सेकदांनी श्वास सोडा.

4. शवासन

या आसनासाठी आपल्याला आकाशाकडे तोंड करुन सामान्य स्थितीत चटईवर झोपावे लागेल. त्यानंतर श्वास घ्या.

5. वज्रासन

वज्रासन करण्यासाठी गुडघ्यावर बसा आणि नंतर उजवा हात मागून समोर वर हलवा आणि उजव्या पायाच्या बोटांना स्पर्श करा. नंतर डावा हात वरपासून मागे फिरवा आणि स्पर्श करा. पुन्हा वज्रासनच्या स्थितीत या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

अश्लील मेसेज, व्हिडिओ पाठवले अन्..., कोल्हापूरच्या भाजप आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं?

लाडक्या बहीण'साठी आनंदाची बातमी, काही तासात खात्यावर ₹१५०० येणार

Nankhatai Recipe : दिवाळीत लहान मुलांसाठी खास बनवा खुसखुशीत नानकटाई, तोंडात टाकताच विरघळेल

Katrina Kaif Pregnancy : "मुलगा असेल की मुलगी असेल गं?" कतरिना कैफच्या प्रेग्नेंसी बद्दल ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT