कोमल दामुद्रे
उन्हाळा सुरु झाला की, आपल्याला सगळीकडे कैरी पाहायला मिळते.
या ऋतूमध्ये कैरीपासून पन्ह, मसाला कैरी, लोणचे, मुरंबा आणि चटणीची चव चाखयला मिळते.
जर तुम्हालाही कैरीपासून आंबट-गोड चटपटीत चटणी बनवायची असेल तर रेसिपी पाहा.
१ कैरी, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, ७ ते ८ लसूण पाकळ्या, १ चमचा मीठ, २ ते ३ चमचे पाणी, चिरलेली कोथिंबीर आणि १ कप ओल्या नारळाचा किस
सर्वात आधी कैरी स्वच्छ धुवून तिचे साल काढा आणि बारीक तुकडे करा.
आता मिक्सरच्या भांड्यात चिरलेली कैरी, मिरची, लसूण, मीठ आणि ओले खोबरे घाला.
वरील मिश्रण मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या. घट्ट झाल्यास थोडे पाणी घालून वाटून घ्या.
तयार होईल चटपटीत आंबट-गोड कैरीची झटपट चटणी