Parenting Tips google
लाईफस्टाईल

Baby Food: १ वर्षापेक्षा लहान बाळांना देऊ नका हे २ पदार्थ! डॉक्टरांनी काय सल्ला दिला? वाचा...

Parenting Tips: १ वर्षाखालील बाळांना दिले जाणारे काही पदार्थ त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. डॉक्टरांनी सांगितलेले टाळावयाचे पदार्थ आणि कारणे जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

घरात लहान बाळ असलं की सगळं वातावरण एकदम आनंदी आणि उत्साही असतं. बाळाला बघायला सतत कुटुंबातली मंडळी, मित्रपरिवार, शेजारची मंडळी येत असतात. अर्थात बाळाच्या घरचेही अगदी आनंदाने त्यांना बाळ दाखवत. त्यांच्याकडे देतात. पण जेव्हा बाळ रांगायला लागतं तेव्हा घरातले कोणी जेवताना किंवा नाश्ता करताना ते शेजारी येतं.

मग आपण जे खातोय ते मागण्याचा हट्ट करतं. आपण त्यांना त्या गोष्टी चाखायला देतोही पण त्यांच्या आरोग्यासाठी ते पदार्थ हानिकारक ठरु शकतात. तज्ज्ञांनी पुढे दिलेल्या माहित १ वर्षाखालील बाळाला कोणतं पदार्थ देणं टाळलं पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

आजकाल बदललेल्या खानपानाच्या सवयींमुळे लहान मुलांच्या आरोग्याबाबत पालक अनेकदा गोंधळात पडतात. बाळ काय खावं आणि काय खाऊ नये, कोणत्या पदार्थांची चव त्यांना चाखायला द्यावी याबाबत पालक जाणून घेत नाहीत. याचा परिणाम लगेचच मुलांच्या आरोग्यावर होतो. एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना तर काही पदार्थ अजिबात खायला घालू नयेत, असा महत्त्वाचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

लखनऊ येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर आस्था यांनी बाळांसाठी कोणते पदार्थ चांगले आणि कोणते नुकसानकारक आहेत याबाबत स्पष्ट माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या मते, अनेक पालक बाळांना दुधात बिस्कीटं देतात. पण बिस्कीटांमध्ये फक्त मैदा आणि साखर असते. याने बाळाला कोणतंच पोषण मिळत नाही हे समजून घेतलं पाहिजे.

सेरेलेक (Cerelac)हा पदार्थही अनेक पालक बाळांना खाऊ घालतात. पण यामध्ये फक्त सारखरंच प्रमाण जास्त असतं. त्यामुळे हा पदार्थ रोज देण्याऐवजी कधीतरीच देणं योग्य आहे. तुम्ही बाळाला गाय किंवा म्हशीचं दूध देणंही कमी केलं पाहिजे.

कारण हे दूध जड असतं आणि बाळाचं पोट ते सहज पचवू शकत नाही. त्यामुळे पोटात त्रास होण्याची शक्यता जास्त असते. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच आणि तेही कमी प्रमाणात हे दूध द्यावं, असं तज्ज्ञ सांगतात. तसेच बाहेरचे कोणतेच पदार्थ बाळ १ वर्षाचं होईपर्यंत देऊ नये.

टीप : ही माहिती केवळ जनजागृतीसाठी आहे. बाळाच्या आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking! वजन कमी करण्याचा प्रयोग ठरला जीवघेणा; यूट्यूबवर पाहिलेल्या औषधामुळे 19 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू

Kalyan : दबावामुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या मृत्यू झाल्याचा आरोप; कल्याण पोलिसांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Boat Accident: मोठी बातमी! ३५० प्रवाशांना घेऊन जाणारं जहाज समुद्रात बुडालं; १५ जणांचा मृत्यू, २८ बेपत्ता

जमिनीच्या वादातून रक्तरंजित थरार! बैठक सुरू असतानाच दोन प्रॉपर्टी डीलरची गोळ्या झाडून हत्या

Backless Blouse: बॅकलेस ब्लाऊजच्या स्टायलिश डिझाईन्स, हे आहेत 5 लेटेस्ट ट्रेडिंग पॅटर्न

SCROLL FOR NEXT