India Post Recruitment 2026: परीक्षा नाही थेट केंद्र शासनाची नोकरी, अट फक्त १०वी पास...

GDS Recruitment 2026: इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक भरती 2026 जाहीर. परीक्षा व मुलाखत नाही. 10वी पास उमेदवारांसाठी केंद्र शासनाची थेट नोकरी संधी, पगार 29,480 रुपयांपर्यंत असेल.
India Post No Exam Job
India Post GDS Recruitment 2026google
Published On

तरुण मंडळी त्यांचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर चांगल्या पोस्टची किंवा चांगल्या पगाराची नोकरी शोधत असतात. चांगली पोस्ट आणि चांगला पगार म्हटंल की अनेकांना भीती वाटते ती मुलाखतीची. त्यामुळे लोक नोकऱ्यांच्या मुलाखतीला जाणं टाळतात. पण केंद्र शासनाने अशाच तरुणांसाठी एक सगळ्यात मोठी संधी आणली आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची मुलाखत किंवा मोठ्या पदवीची आवश्यकता नाही.

इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीबाबत एक मोठी अपडेट आली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ही भरतीची माहिती समोर आली आहे. यामध्ये २५,००० हजारांपेक्षा जास्त ग्रामीण डाक सेवकांची भरती करण्यात येणार आहे. जर तुम्हाला याचा अर्ज भरायचा असेल तर पुढील माहिती वाचावी लागेल.

India Post No Exam Job
Jio Recharge Plan: धमाल! Jioचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज, दिवसाला फक्त ५ रुपयांचा खर्च; वाचा संपूर्ण माहिती

सर्वप्रथम या कामासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. भारतीय पोस्ट ऑफिसने या भरती प्रक्रियेची अधिसूचना काही दिवसांपुर्वीच प्रसिद्ध केली आहे. यासाठी तुम्हाला किमान १०वी पास असणे आवश्यक आहे. त्यांनाच हा अर्ज भरता येणार आहे.

अर्जाची सुरुवात ही २० जानेवारी २०२६ पासून झाली आहे. त्यासाठी कोणत्याही मुलाखतीची आवश्यकता नाही. याची निवड थेट करता येणार आहे. तुमच्या मार्कांच्या आधारे तुमची निवड केली जाईल. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी ही अर्ज प्रकिया थांबवण्यात येईल. त्यापुर्वीच इच्छुकांनी अर्ज करावा.

तुम्हाला नोकरीसाठी १० वा रिझल्ट लागणार आहे. तसेच तुमच्या गणिताच्या मार्कांना पाहिले जाणार आहे. तर भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला शिल्क भरावे लागतील. त्याची तारिख ५ फेब्रुवारी २०२६ रात्री ११ पर्यंत अशी असणार आहे. मेरिट लिस्ट होण्याची तारीख २० फेब्रुवारी असेल. तर याचे वेतन ७ व्या वेतन आयोगानुसार दरमहा १० हजार ते २९,४८० च्या दरम्यान असेल.

India Post No Exam Job
Shahid Kapoor Fitness Secret: ''घरचं खा अन् फीट राहा'' शाहिद कपूरने सांगितलं त्याचं डाएटचं सिक्रेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com