Sakshi Sunil Jadhav
Jioचे युजर्स देशभरात मोठ्या प्रमाणात आहेत. तितक्याच ऑफर्स सध्या जिओ ग्राहकांना देत आहे.
पुढे आपण Jioच्या प्रीपेड रिचार्ज प्लान आणि त्यांच्या फायद्याबद्दल जाणून घेणार आहोत.
जिओच्या प्रीपेड सेगमेंटमध्ये बरेच वेगवेगळे प्राइस सेगमेंट आहेत. तसेच त्यांचे विविध फायदे आहेत.
Jioच्या पोर्टलवर ४४८ रुपयांचा रिचार्ज प्लान आहे. यामध्ये कॉलिंगच नाही तर अनेक फायदेही मिळणार आहेत.
Jioच्या या रिचार्ज प्लानचा कालावधी ८४ दिवसांचा असेल आणि दिवसाचा खर्च हा ५.३ रुपयांचा असेल.
तुम्हाला या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. यासोबत तुम्हाला रोमिंगचाही समावेश असेल.
Jioच्या ४४८च्या रिचार्ज प्लानमध्ये १०० sms ची मुभा मिळणार आहे. याचा वापर तुम्ही महत्वाच्या कामासाठी निश्चितच करु शकता.
Jioच्या ४४८ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सना डेटा मिळणार नाही.
युजर्सना यामध्ये दोन कॉम्पलीमेंट्री अॅप्स पाहता येऊ शकतात. त्यामध्ये Jio Tv आणि Jio AI Cloud चा समावेश आहे.