Sakshi Sunil Jadhav
Reliance Jioने त्यांच्या युजर्ससाठी नव्या वर्षात अनेक ऑफर्स आणि नवा रिचार्ज प्लान आणले आहेत. त्यापैकीच एक लोकप्रिय प्लॅन म्हणजे 198 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज.
Jio च्या ऑफिशियल पोर्टलवर 198 रुपयांचा रिचार्ज प्लॅन दिलेला आहे. तुम्ही तिथून रिचार्ज करु शकता.
तुम्हाला या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळते. रोमिंग कॉलिंगचाही यात समावेश आहे.
युजर्सना दररोज 2GB हाय-स्पीड इंटरनेट डेटा दिला जातो. 14 दिवसांच्या वैधतेमध्ये एकूण 28GB डेटा वापरता येतो.
हा प्लॅन फक्त 14 दिवसांसाठी वैध आहे. त्यामुळे शॉर्ट-टर्म युजर्ससाठी हा फायदेशीर ठरतो.
या प्लॅनमध्ये दररोज 100 SMS मोफत दिले जातात, जे संपूर्ण 14 दिवसांसाठी वैध असतात.
युजर्सना Jio TV आणि Jio AI Cloud या दोन अॅप्सचा मोफत वापर करता येतो.
कमी कालावधीसाठी डेली 2GB डेटा हवा असणाऱ्या युजर्ससाठी हा प्लॅन फायदेशीर आहे. 28 दिवसांची वैधता हवी असेल तर 349 रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे.