urinary infection saam tv
लाईफस्टाईल

Summer Urinary Burning: उन्हाळी टाळायची असेल, तर काय काळजी घ्याल?

Summer Urinary Infection: यंदाच्या वर्षी संपूर्ण राज्यात गतवर्षीपेक्षा अधिक उकाडा जाणवत आहे, यामुळे आरोग्य विभागाने देखील नागरिकांना दुपारी घराबाहेर न पाडण्याचे आवाहन केले आहे.

Omkar Sonawane

उन्हाळ्याच्या दिवसात मूत्रविसर्जन करताना लघवीच्या जागेची म्हणजेच मूत्रमार्गाची आग होण्याच्या त्रासाला उन्हाळी लागणे म्हणतात. बऱ्याच जणांना हा त्रास होत असतो.

उन्हाचा उकाडा वाढला की हा त्रास व्हायला सुरुवात होती. साधारणपणे मार्च ते जून आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये अनेकांना उन्हाळीचा त्रास होतो. स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक दिसते. मानवी मूत्र हे रासायणिकदृष्ट्या अंमल किंवा अल्कली या दोन्हीच्या मध्यावर म्हणजे न्यूट्रल असते.

उन्हाळी लागते तेव्हा मूत्राची आम्लता वाढते. मूत्रमार्गातील आतील त्वचेत या आम्ल झालेल्या मूत्राचा संबंध येतो तेव्हा आयुर्वेदानुसार पित्तदोष वाढतो आणि मूत्रमार्गाची जळजळ होते.

आग होण्याची कारणे,

1 कमी पाणी पिणे

2 मूत्रनालिकेत किंवा मूत्राशयामध्ये खडे

3 मूत्राशयात इन्फेक्शन होणे

4 लैंगिक संक्रमित रोग (एसटिडी)

उन्हाळी लागू नये म्हणून काय काळजी घ्याल?

दिवसभरात दर तासाला 1 ते 1.5 ग्लास पाणी प्यावे.

तसेच लिंबू सरबत, किणणू चे ज्यूस, ताक, लस्सी प्यावी

लिंबू पाण्यात किंवा ताकात सबजा टाकून प्यावे

जर तुम्हाला उन्हाळीचा त्रास होत असेल तर...

आपल्या शरीराचे नेहमीचे तापमान 36.8 अंश सेंटीग्रेटेड असते. उन्हाळ्यामध्ये वातावरणातील तापमान 40 अंशाच्या पुढे गेल्यावर उष्णतेची लाट निर्माण होते. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 40 अंशावर पोहोचले आहे. अशावेळेस शरीरात देखील मोठ्या प्रमाणात तापमान वाढू लागते. त्यामुळे घाम सुटतो. शरीरातील रक्त आणि पेशींमधील पाणी तसेच क्षार यापासून घाम तयार होतो. घाम अतिप्रमाणात शरीराच्या बाहेर गेल्याने क्षारांचे प्रमाण कमी होऊन मूत्र आम्लस्वरूप घेते. यालाच आपण उन्हाळी लागली असे म्हणतो.

यासाठी काही घरगुती उपाय आहे जे फायदेशीर ठरतात. खडीसाखर बारीक कुटून घ्या, खडीसाखरेची पावडर आणि बडीशेप सम प्रमाणात घ्या, म्हणजेच दोन्ही एकेक चमचा घ्या आणि ग्लासभर पाण्यात ते रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून पिणे. हा उपाय केल्याने उन्हाळी लागण्याचा त्रास कमी होण्यास मदत होईल. तसेच नारळपाणी, लिंबू सरबत, टरबूज, संत्री, द्राक्ष अशा पदार्थांचे सेवन करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT