Liver Health: लिवर डॅमेज टाळायचंय? मग ‘या’ चुकीच्या सवयी त्वरित सोडा आणि आरोग्य सुधारा

Avoid Liver Damage: लिवर शरीरातील महत्त्वपूर्ण अवयव आहे, जो चयापचय, विषारी पदार्थ नष्ट करणे, पचन आणि इतर कार्यांमध्ये भूमिका बजावतो.
Liver Health
Liver Healthfreepik
Published On

शरीरातील सर्व अवयवांचे योग्य कार्य महत्त्वाचे आहे, पण सध्याच्या दैनंदिन जीवनशैली आणि आहारामुळे अवयवांची समस्या वाढली आहे. लिवरशी संबंधित आजारांमुळे आरोग्य सेवांवर ताण वाढत आहे. विशेषत: २० वर्षांखालील तरुणांमध्ये लिवरचे आजार लक्षणीय वाढले आहेत, ज्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने एक मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे लिवरचे आरोग्य राखणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.

लिवर हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे, जो चयापचय, विषारी पदार्थ काढून टाकणे, पचन आणि इतर कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. लहानपणापासून लिवरच्या आरोग्याकडे लक्ष दिल्यास त्याचे आजार टाळता येऊ शकतात. काही सवयी आपल्या यकृताला हळूहळू नुकसान पोहोचवतात. त्या सवयींच्या त्रासापासून ताबडतोब दूर राहून, यकृताचे आरोग्य कायम राखा.

Liver Health
Bathing Tips: घामाच्या वासाने त्रास होतोय? आंघोळीसाठी पाण्यात मिसळा 'या' वस्तू, करा घरगुती उपाय

नियमितपणे अल्कोहोल पिणाऱ्यांना फॅटी लिवर, हेपेटायटीस आणि सिरोसिससारख्या गंभीर लिवरच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. कमी प्रमाणात देखील मद्यपान लिवरला हानी पोहोचवू शकते. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, लिवरचे आरोग्य राखण्यासाठी दारूचा वापर पूर्णपणे टाळावा. मद्यपान न केल्यास लिवरच्या आजारांचा धोका ४०% पर्यंत कमी होऊ शकतो.

Liver Health
Healthy Skin Habits: रोज साबण वापरणं आरोग्यास योग्य की घातक? जाणून घ्या 'या' सवयीबाबतच्या गोष्टी

आपण जे खाते आणि पितो, त्याचा थेट परिणाम लिवरवर होतो. अस्वास्थ्यकर आहार, जंक फूड, आणि ट्रान्स फॅट्स लिवरसाठी हानिकारक ठरतात. जास्त साखर आणि उच्च फ्रुक्टोज कॉर्न सिरप नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिवरला कारणीभूत ठरते. लिवरचे आरोग्य राखण्यासाठी संतुलित आहार घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com