Healthy Skin Habits: रोज साबण वापरणं आरोग्यास योग्य की घातक? जाणून घ्या 'या' सवयीबाबतच्या गोष्टी

Daily Soap Use: साबणाचा दररोज वापर फायदेशीर वाटू शकतो, पण त्याचे काही तोटेही आहेत. त्यामुळे रोज अंघोळीपूर्वी वापरलेला साबण त्वचेसाठी योग्य आहे का ते तपासणे आवश्यक आहे.
Daily Soap Use
Daily Soap Usefreepik
Published On

उन्हाळ्यात प्रत्येकजण ताजेतवाने राहण्यासाठी दिवसातून अनेक वेळा अंघोळ करतो आणि सुगंधी साबणाचा वापरही वाढतो. हे साबण काही वेळा त्वचेला ताजेपणा देतात, मात्र त्याचा नियमित वापर शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. रोज अंघोळ करणे आरोग्यासाठी चांगले असले तरी रोज साबण वापरणे टाळावे. त्यामुळे आठवड्यातून किती वेळा साबण वापरावा, याची योग्य माहिती असणे आवश्यक आहे. आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

जर त्वचा तेलकट असेल

जर तुमची त्वचा अतिशय तेलकट असेल, तर दररोज सौम्य साबणाने अंघोळ करणे योग्य ठरते. मात्र, साबण निवडताना त्यात रसायने नसावीत, हे लक्षात ठेवावे. कारण रासायनिक साबण त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात आणि नैसर्गिक तेलांचे संतुलन बिघडवू शकतात, त्यामुळे सावधगिरी आवश्यक आहे.

Daily Soap Use
Skin Care Tips: क्लिनअप केल्यानंतर 'या' गोष्टी चुकूनही करू नका, अन्यथा चेहऱ्याला होतील मोठे नुकसान

जर तुमची त्वचा सामान्य असेल

सामान्य त्वचा असणाऱ्यांनी देखील दररोज साबणाचा वापर टाळावा. आठवड्यातून ३-४ वेळा सौम्य साबणाने अंघोळ करणे पुरेसे ठरते. जर तुम्हाला घाम कमी येत असेल, तर रोज फक्त साध्या पाण्याने अंघोळ करूनही ताजेतवाने राहता येते आणि त्वचेचं आरोग्य टिकून राहतं.

Daily Soap Use
Diabetes: रक्तातील साखरेच्या पातळीतील चढ-उतार टाळायचाय? जाणून घ्या यामागची कारणं आणि त्यावर उपाय

वृद्ध लोक आणि मुले

घराबात लहान मुले किंवा वृद्ध मंडळी असल्यास, त्यांना साबणाचा मर्यादित वापर करणे आवश्यक आहे. त्यांची त्वचा अतिशय नाजूक असते, त्यामुळे दररोज साबण वापरण्याऐवजी आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळा सौम्य आणि रसायनमुक्त साबण वापरणे जास्त सुरक्षित आणि त्वचेस अनुकूल ठरते.

Daily Soap Use
Healthy Yoga: योग करताना टाळा 'या' चुका, निरोगी शरीरासाठी जाणून घ्या ५ नियम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com