Skin Care Tips: क्लिनअप केल्यानंतर 'या' गोष्टी चुकूनही करू नका, अन्यथा चेहऱ्याला होतील मोठे नुकसान

Beauty Tips: क्लिनअप केल्यानंतर त्वचेला योग्य पोषण आणि विश्रांती देणे आवश्यक असते. त्वचेला स्वच्छ, टवटवीत ठेवण्यासाठी नंतरची योग्य काळजी कशी घ्यावी, ते जाणून घ्या.
Skin Care Tips
Skin Care Tipsfreepik
Published On

सध्याच्या वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेची योग्य निगा राखणे अत्यंत आवश्यक झाले आहे. अनेकदा लोक त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देतात, पण त्वचेकडे दुर्लक्ष करतात. त्वचा निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी क्लिनअपसारख्या उपचारांचा अवलंब करणे महत्त्वाचे ठरते. क्लिनअपद्वारे चेहऱ्याची सखोल स्वच्छता होते, जे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. आजकाल महिलांसोबतच पुरुषही त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी क्लिनअप करायला लागले आहेत. या ट्रेंडिंग उपचारांमुळे त्वचा उजळ, स्वच्छ आणि तजेलदार दिसते. त्यामुळे नियमित क्लिनअप करणे त्वचेसाठी फायदेशीर ठरते.

चेहरा घासणे

क्लिनअप करून आल्यानंतर अनेकांना चेहरा धुवावा असं वाटतं, पण हे टाळणंच योग्य ठरतं. कारण त्या वेळेस त्वचा खूप नाजूक असते. चेहरा जोरात घासल्याने त्वचेचा पोत बिघडू शकतो. त्यामुळे क्लिनअपनंतर चेहरा न घासणे, खाजवू नये आणि त्वचेवर हलक्या हातानेच स्पर्श करावा, ही काळजी घेणे आवश्यक आहे.

Skin Care Tips
Skin Care Tips: तुम्हीही 'या' चुका करता का? मुलींनी त्वचेची काळजी घेताना अशा चुका टाळायलाच हव्यात, अन्यथा...

मेकअप लावणे

क्लिनअपनंतर त्वचेची छिद्रे उघडलेली असतात, त्यामुळे लगेच मेकअप करणं टाळावं. अशा वेळी मेकअप केल्यास छिद्र बंद होतात आणि त्वचेमध्ये तेल, धूळ साचते. यामुळे मुरुमांची शक्यता वाढते. त्यामुळे क्लिनअपनंतर किमान काही तास तरी त्वचेला विश्रांती द्या आणि नैसर्गिक पद्धतीने तिचं आरोग्य जपण्याचा प्रयत्न करा.

Skin Care Tips
Healthy Yoga: योग करताना टाळा 'या' चुका, निरोगी शरीरासाठी जाणून घ्या ५ नियम

गरम पाण्याने चेहरा धुणे

क्लिनअप केल्यानंतर त्वचा संवेदनशील होते, त्यामुळे त्या वेळेस गरम पाण्याने चेहरा धुणे टाळा. गरम पाण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक आर्द्रता कमी होते, ज्यामुळे कोरडेपणा, ताण आणि जळजळ निर्माण होऊ शकते. चेहरा धुवायची गरज असल्यास फक्त थंड किंवा कोमट पाण्याचा वापर करा, जेणेकरून त्वचेचे संतुलन टिकून राहील.

सनस्क्रीन न लावणे

क्लिनअप केल्यानंतर त्वचेची छिद्रे उघडी राहत असल्यामुळे त्वचा अधिक संवेदनशील होते. अशा वेळी जर तुम्ही सनस्क्रीन न लावता बाहेर गेलात, तर त्वचेला सूर्याच्या किरणांचा थेट सामना करावा लागतो, ज्यामुळे सनबर्न आणि टॅनिंगचा धोका वाढतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com