पनवेलमध्ये मतदार यादीतील मोठा घोळ उघड; 268 मतदारांचा एकच बाप

Panvel News : पनवेलमध्ये मतदार यादीतील मोठा घोळ उघड झाला आहे. पनवेलमध्ये 268 मतदारांचा एकच बाप असल्याचा घोळ उघडकीस झाल्यानंतर मनसेने आयोगावर एकच संताप व्यक्त केला.
Maharashtra voters news
panvel voters Saam tv
Published On
Summary

मतदार यादीत एका व्यक्तीची तब्बल 268 मुले नोंदवली असल्याचा घोळ उघड

मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी हा प्रकार उघड केला

याच प्रभागात दोन हजारांहून अधिक बोगस मतदार असल्याचा मनसेचा दावा

पनवेलमधील तोंडरे गावातील एका यादीतील एका व्यक्तीला तब्बल 268 मुले असल्याचा खुलासा मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी केला आहे. सर्व 268 मुले हे एकाच घरात वास्तव्यास असल्याची नोंद सुद्धा या मतदार यादीमध्ये करण्यात आल्याचे समोर आलं आहे. यावरून मनसेने तीव्र संताप व्यक्त करत निवडणूक अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. ज्या बीएलओंने या मतदारयादीवर काम केलं, त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार का? असा सवालच मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी अधिकाऱ्यांना विचारलाय. बोगस मतदार जर का मतदान केंद्रावर आले तर त्यांना मनसे स्टाइल चोप देण्यात येणार, असा इशाराही त्यांनी दिला. यामुळे आता निवडणूक आयोगाच्या या भोंगळ कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

२६८ मतदारांचा एकच बाप असल्याचा मतदार यादीतील घोळ समोर आलाय. ही यादी पनवेल महापालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक दोनमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. हे मतदार उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशमधील तरुण असल्याचे सांगण्यात येतंय. ही मुले हरीश नावाच्या व्यक्तीची असल्याचेही योगेश चिले यांनी सांगितलं. या प्रभागात तब्बल दो हजारांहून अधिक बोगस मतदारांची नोंद करण्यात आल्याचाही दावा मनसे प्रवक्ते चिले यांनी केलाय. पनवेलमध्ये मतदार यादीत एकाच बापाची 265 हून अधिक मुले… नक्की कोण धृतराष्ट्र झाले आहे? बाप की निवडणुक आयोग असा सवाल त्यांनी केला.

Maharashtra voters news
Maharashtra Politics : अजित पवार पुढच्या काळात मुख्यमंत्री असतील; मिटकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मतदार यादी नंबर 47, 48 आणि 50 मध्ये हा संपूर्ण घोळ आहे. मतदार यादी क्रमांक 183 आणि 184 मधील मतदार हे पनवेलमध्ये अस्तित्वात नसलेल्या इमारतीतील रहिवासी दाखवण्यात आले आहेत. ज्या घरात 268 लोकांची नोंद झालीये, त्या घरात आणखी 40 ते 50 इतर लोकांची नावे देखील नोंदवल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये.

Maharashtra voters news
Pune : पुणे जिल्ह्यात किती ठिकाणच्या निवडणुका रद्द झाल्या, वाचा संपूर्ण यादी

268 लोकांपैकी केवळ 8 ते 10 मराठी नावे आहेत. बाकीचे मतदार उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील आहेत, असा खळबळजनक प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com