Maharashtra Politics : अजित पवार पुढच्या काळात मुख्यमंत्री असतील; मिटकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Political News : अजित पवार पुढच्या काळात मुख्यमंत्री असतील, असा दावा मिटकरी यांनी केला आहे. मिटकरींच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.
Maharashtra Politics
Ajit Pawar Saam tv
Published On
Summary

अजित पवार पुढील मुख्यमंत्री असतील, असा मिटकरींचा दावा

लाडकी बहीण योजना ही अजित पवारांची कल्पना असल्याचेही त्यांनी म्हटलंय

राष्ट्रवादीने हा विषय काढून भाजप व शिंदे गटाला डिवचल्याचंही सांगण्यात येत आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या पुर्वसंध्येलाच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा उकरून काढलाय. अजित पवार पुढच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील‌‌. राज्याच्या आणि तिजोरीच्या चाव्या या अजित पवारांकडे असणार आहेत, असं आमदार अमोल मिटकरी म्हणालेयेत. ते अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथे राष्ट्रवादीच्या नगरपंचायतच्या प्रचारसभेत बोलत होते.

महायुती सरकारमधील लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून तीनही पक्षात कुरघोडी सुरूये. आज बार्शीटाकळीत बोलतांना अमोल मिटकरींनी 'लाडकी बहीण योजना' ही अजित पवारांच्या कल्पकतेतून पुढे आल्याचा दावा केलाय. यासोबतच अजित पवार महाराष्ट्राचे अर्थमंत्री असेपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नसल्याचं ते म्हणाले आहेत.

'लाडकी बहीण योजनेचे जनकच अजित पवार असल्याचा दावा मिटकरी यांनी केलाय. त्यामुळे मतदानाच्या पूर्वसंध्येलास लाडकी बहीण योजनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसने आपले मित्र पक्ष असलेल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला डिवचल्याचं बोलले जातंय.

Maharashtra Politics
भाजप आणि शिंदेसेनेत वादाची ठिणगी, राणे बंधूंमध्ये वाद पेटला; नेमकं काय घडलं?

भाजपचे आमदार हरीश पिंपळे प्रचारादरम्यान भावुक

आज प्रचाराचा अखेरचा दिवस होता. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा रात्री दहा वाजल्यानंतर प्रचार थांबणार आहे. सर्वच उमेदवार शक्ती प्रदर्शन आणि घरोघरी जाऊन मतदारांची प्रत्यक्ष संपर्क साधण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर शहरात भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन करत पायदळ रॅली काढलीय. भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांच्या नेतृत्वात ही प्रचार रॅली निघाली होती..

Maharashtra Politics
प्रसिद्ध रेस्टॉरंटचा मालक कर्जात बुडाला, नैराश्यात घेतला टोकाचा निर्णय

नुकतच भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांच्या वडिलांचे दुःखद निधन झालं. घरात दुःख असताना नगरपालिका निवडणुकीच्या भाजपच्या प्रचारात पिंपळे दिसून येतायेत. घरात दुःख खूप आहे, मात्र पक्षाचा बांधील आहोत.. पक्षाने दिलेली जबाबदारी निश्चितच पार पाडत आहे, असं बोलताना आमदार पिंपळे अश्रू अनावर झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com