Causes of Female Infertility : वाढत्या वयानुसार स्त्रियांमध्ये आढळते वंध्यत्वाची समस्या, कारण काय? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Women Infertility Reasons: वाढत्या वयाचा स्त्रियांच्या शरीरावर परिणाम होतो. उशिरा लग्न झाल्याने महिलांना वंध्यत्वाची समस्या निर्माण होते.
Causes of Female Infertility
Causes of Female InfertilitySaam Tv
Published On

वाढत्या वयानुसार महिलांना अनेक आजार होतात. वयानुसार त्यांच्या आहारात, जीवनशैलीतबदल होतात. त्यामुळे शरीराला त्रास होतात. त्यामुळे खूप कमी वयात वंधत्वाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे लग्न उशीराने करणे. सध्या ३० वयानंतर अनेकजण लग्न करतात. त्यामुळे वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. जवळपास १० टक्के लोकांना उशीरा लग्न केल्याने वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. यामुळे तुमच्या प्रजननक्षमतेला हानी पोहचते. त्यामुळे गर्भधारणा होण्यास अडचणी येकाक.

Causes of Female Infertility
Adulteration in Milk : दूधात पाणी आहे का? FSSAI ने सांगितली भेसळ ओळखण्याची सिंपल ट्रीक

उशीराने होणारा विवाह आणि वंध्यत्व

स्त्रियांच्या वयानुसार गर्भधारणेची शक्यता खूपच कमी होते. लैंगिक संभोग कमी होणे,गर्भाशयासंबंधी समस्या, स्त्रीबीजांची संख्या कमी होणे यामुळे वंध्यत्व येते. 35 ते 38 वर्षांनी प्रजनन क्षमता कमी होते. महिलांना 24-35 वर्षांच्या दरम्यान गर्भधारणेचा सल्ला दिला जातो. पस्तीस वयानंतर महिलांना गर्भधारणेसाठी विविध आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. अनेक स्त्रिया भविष्यात उशीराने मूल होण्यासाठी पर्याय म्हणून एग फ्रीझिंग आणि सरोगसीची निवड करत आहेत. प्रजनन क्षमता कमी होणे ही केवळ स्त्रीयांचीच नव्हे तर पुरुषाचीही समस्या आहे. वयानुसार पुरुषांची प्रजनन क्षमता देखील हळूहळू कमी होते.

Causes of Female Infertility
Marriage Astrology : लग्न जुळत नसलेल्या व्यक्तींनी आजपासून 'हा' उपाय सुरू करा; महिन्याच्या आत आनंदाची बातमी मिळेल

स्त्रिया आणि पुरुषांमधील वंध्यत्वाची लक्षणे

वंध्यत्व असलेल्या स्त्रियांना अनियमित मासिक पाळी, वेदनादायक मासिक पाळी, गर्भपात, वजन वाढणे, लैंगिक इच्छा कमी होणे, चेहऱ्यावरील केसांची वाढ आणि हार्मोनल चढउतार यासारख्या समस्या भेडसावू शकतात. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे, अंडकोष, प्रोस्टेट किंवा लैंगिक अवयवांच्या समस्या, अंडकोषाला सूज येणे किंवा लहान अंडकोष, स्खलन समस्या, नैराश्य, वजन वाढणे आणि थकवा अशा समस्या जाणवतात.

डॉ. स्वर्णा गोयल, प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ, लीलावती हॉस्पिटल

Causes of Female Infertility
Relationship : मुलींनो, पर्टनरवर तुमचं जीवापाड प्रेम आहे? मग आजच 'या' तीन प्रश्नांची उत्तरे त्याला विचारा, नातं आणखी घट्ट होईल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com