

हिंगोलीत मतदानाच्या आदल्या दिवशी कारमधून मोठी रोकड जप्त.
बॅगेत 100, 200, 500 आणि 50 रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले.
पोलिसांनी आमिषवाटप रोखण्यासाठी तपासणी मोहीम वाढवली.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उद्या २ डिसेंबर रोजी राज्यातील जवळपास अडीचशेपेक्षा जास्त नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी नेते, कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचत मत मागत आहेत. उद्या मतदान होणार असल्यानं पोलीस (Police) यंत्रणाही सतर्क झाली आहे. त्यामुळे पैसे वाटप, आमिष दाखवून होणाऱ्या इतर वस्तूंच्या वाटपाकडे लक्ष ठेऊन आहे. त्याच दरम्यान हिंगोली शहरात एका बॅगमध्ये मोठी रोकड सापडली आहे.
पोलिसांना एका कारमधील बॅगेत 100,200,500 अन् 50 रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले आहेत. हिंगोली शहरांतील शेतकरी भवन परिसरामध्ये हा प्रकार घडलाय. हिंगोली पोलिसांच्या पथकाने टाटा नेक्सन कंपनीच्या करमध्ये एक कोटी रुपयांची रोकड मिळून आलीय. पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या चार चाकी गाडीची तपासणी केली. त्यात बॅगमध्ये मोठी रक्कम आढळून आली.
या बॅगमधील संपूर्ण रोकड घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या कार्यालयात दाखल झालेत. दरम्यान पोलिसांनी जप्त केलेली ही रोकड एका खासगी व्यापाऱ्याची असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच कॅश बाळगण्याबाबत त्यांच्याकडे परवानगी असल्याचं संबंधित व्यक्तीने म्हटलंय. मात्र निवडणूक विभागाच्या वतीने संबंधित रोकड पडताळणी आणि प्राथमिक चौकशीच्या अनुषंगाने ताब्यात घेण्यात आली असून रोकड मोजली जातेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.