Local Body Election: महाराष्ट्रातील निवडणुका पुढे का ढकलल्या? विरोधकांच्या आरोपांनंतर राज्य निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा

Local Body Election Update: राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. यात नगरपालिका आणि नगरसेवकांच्या जागांचा समावेश आहे. विरोधकांच्या टीकेनंतर आता निवडणूक आयोगाने निवडणुका लांबणीवर टाकण्याबाबत खुलासा केलाय.
Local Body Election Update:
State Election Commission clarifies why 24 local body elections in Maharashtra were postponed after opposition raised objections.saamtv
Published On
Summary
  • नगरसेवक आणि नगराध्यक्षपदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

  • स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

  • राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकाने दिलं स्पष्टीकर

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार आहेत. मात्र जवळपास २४ ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकल्यात आल्या आहेत. नगराध्यक्षपद आणि शेकडो प्रभागातील नगरसेवकपदाच्याही निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे बहुतांश कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांची, उमेदवार नाराज झालेत.

Local Body Election Update:
Dry Day in Maharashtra: ऐकलं का! राज्यात तीन दिवसांसाठी ड्राय-डे, कोण-कोणत्या शहरांमध्ये मद्यविक्री बंद?

निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावर टीका केली होती. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही या निर्णयावर संतापले होते. यासाठी त्यांनी राज्य सरकारलाच जबाबदार धरले. विरोधकांची टीकेनंतर आता राज्य निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण दिलंय. सर्व बाजूंचा विचार करुन आणि कायदेशीर सल्ला घेऊन काही निवडणुका पुढे ढकलल्या, असं राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येत आहे.

Local Body Election Update:
Local Body Election: जिल्हा परिषद की महानगरपालिका, दुसर्‍या टप्प्यात कोणत्या निवडणुका होणार? महत्त्वाची बातमी समोर

राज्यातील एकूण २४ नगरपालिका आणि दीडशे सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या निवडणुका २० डिसेंबरला होणार आहेत. मात्र या निर्णयाचा सध्याच्या निवडणुकांवर परिणाम होणार नसल्याचं राज्य निवडणूक आयोगाने म्हटलंय. १७ १ (ब) तरतुदीनुसार उमेदवाराने कोर्टात अपील केल्यास उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणं गरजेचं होतं.

अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर परिणाम झाला असता आणि निवडणुका स्थगित कराव्या लागल्या असत्या. त्यामुळे ठराविक निवडणुका पुढे ढकल्याची माहिती आयोगामधील सूत्रांकडून देण्यात आलीय.

Local Body Election Update:
Maharashtra Politics: 'महायुती'तला बेबनाव दिल्लीपर्यंत; भाजप बाटलेली, अजितदादांच्या मंत्र्याचा हल्लाबोल

ज्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत त्यांना नियम 'क' आणि 'ड' प्रमाणे पुरेसा वेळ देण्यात आलाय. त्यानुसार पुढे ढकललेल्या निवडणुका २० डिसेंबर रोजी घेण्यात येत आहेत. राज्यातील २४ नगरपालिकामधील नगराध्यक्ष आणि १५० च्या जवळपास सदस्यांच्या प्रचार खर्चाचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने विचाराधीन ठेवलाय. याबद्दल लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com