New Research Reveals Indole Metabolites
"Scientists identify natural anti-aging molecules that may help keep skin youthful and glowing."saam tv

Health Tips: आजोबा म्हणणार, अभी तो मैं जवान हूँ; साठीनंतरही तुम्ही दिसणार 'तरुण'

New Research Reveals Indole Metabolites : वय वाढलं की माणसाच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागतात. पण, आता तुम्ही साठीतही तरुण राहू शकता. हे कसं शक्य आहे. पाहुयात हा रिपोर्ट.
Published on
Summary
  • एका संशोधानामुळे तरुण दिसण्यासह त्वचा नितळ आणि तजेलदार ठेवता येणं शक्य होणार

  • इंडोल मेटाबोलाइट्स त्वचेतील पेशींवर वृद्धत्वामुळे होणारा ताण कमी करेल

  • 'अमेरिकन केमिकल सोसायटी' आणि 'अमेरिकन सोसायटी ऑफ फार्माकोग्नोसी'चा रिपोर्ट

साठीनंतरही तरुण दिसावं..असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे भविष्यात वृद्धत्वावर मात करून आपलं सौदर्य आहे तसचं टिकवून ठेवण्याचं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. मुळात वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या यायला आणि चेहऱ्यावरचा तजेलदारपणा हरवायला लागतो. मात्र शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधानामुळे तरुण दिसण्यासह त्वचा नितळ आणि तजेलदार ठेवता येणं शक्य होणार आहे. ते कसं पाहूयात.

आपली त्वचा नितळ आणि तजेलदार दिसावी यासाठी मास्क, क्रीम आणि इतर घटकद्रव्यांचा वापर करतात. मात्र, आता संशोधकांनी शरीरात नैसर्गिकरीत्या निर्माण होणारी काही वृद्धत्व प्रतिबंधक क्षमता असलेले रेणू शोधलेत. त्यामुळे शास्त्रज्ञांनी शोधलेली इंडोल मेटाबोलाइट्स त्वचेतील पेशींवर वृद्धत्वामुळे होणारा ताण कमी करण्यासाठी आणि त्वचेतील प्रथिनांची हानी करणारी क्रिया रोखण्यासाठी उपयुक्त आहे. 'अमेरिकन केमिकल सोसायटी' आणि 'अमेरिकन सोसायटी ऑफ फार्माकोग्नोसी' यांनी हा रिपोर्ट प्रसिद्द केलाय.

दरम्यान शास्त्रज्ञांनी रक्तप्रवाहातील मेटाबोलाइट्सचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो याचा अभ्यास केलाय.. या मेटाबोलाइट्सपैकी एका गटाला इंडोल संयुग म्हटले जाते. या संयुगात वृद्धत्व प्रतिबंधकतेचं वैशिष्ट्य आढळले आहे. त्यामुळे लवकरच आजोबा आपल्या नातवाला, अभी तो मैं जवान हूँ असं म्हणू शकतील. मात्र शास्त्रज्ञांच्या संशोधनानंतर मानवी शरीरावर या मेटाबोलाइट्सचा काय परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com