इस्टर्न फ्रीवेचा विस्तार होणार, आता दक्षिण मुंबई ते ठाण्यात ३० मिनिटांत पोहोचा; कधी होणार काम पूर्ण?

Eastern Freeway : इस्टर्न फ्रीवेचा विस्तार करण्यात येणार आहे. आता दक्षिण मुंबई ते ठाण्यात ३० मिनिटांत पोहोचता येणार आहे.
Eastern Freeway extenstion
Eastern Freeway :Saam tv
Published On
Summary

एमएमआरडीएने इस्टर्न फ्रीवेचा छेडानगर ते ठाण्यापर्यंत विस्तार करण्यात येणार

प्रकल्पासाठी 13.9 किमी उन्नत मार्गासाठी 2,683 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

महत्वाचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर दक्षिण मुंबई–ठाणे प्रवास फक्त 30 मिनिटांत शक्य होणार

ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील मोठ्या प्रमाणात कोंडी कमी करण्यात उन्नत मार्गाचा फायदा होणार

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने इस्टर्न फ्रिवेचा विस्तार करण्यात निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे घाटकोपरच्या छेडानगर ते ठाण्यातील आनंद नगरपर्यंत उन्नत बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी २,६८३ कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

Eastern Freeway extenstion
कुटुंब अंत्यविधीसाठी गेलं; चोरटे दरवाजा तोडून घरात घुसले, मारला वॉशिंग मशीनमधील दागिने आणि पैशांवर डल्ला

इस्टर्न फ्रिवेच्या विस्ताराचे काम पूर्ण झाल्यास ठाणे ते दक्षिण मुंबईमधील प्रवास अवघ्या ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे. एमएमआरडीएचा वाहनधारकांचा सिग्नलमुक्त प्रवास व्हावा, हा मानस आहे. प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात येणारा उन्नत मार्ग हा १३.९० किमी लांबीचा असणार आहे. सध्या इस्टर्न फ्रीवे हा मानखूर्दमध्ये संपतो.

नव्या प्रकल्पात हा मार्ग छेडा नगरपासून सुरु होणार आहे. या मार्गात घाटकोपर , रमाबाई नगर, विक्रोळी, कांजूरमार्ग, जेव्हीएलआर,ऐरोली ,मुलुंड ठाण्यातील आनंदनगर असे ठिकाण असेल. या उन्नत मार्गामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचा प्रवास वेगवान होईल.

Eastern Freeway extenstion
Maharashtra Politics : अजित पवार पुढच्या काळात मुख्यमंत्री असतील; मिटकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

या उन्नत मार्ग समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रकल्पासाठी विक्रोळी–घाटकोपर मार्गाचे रियलायन्मेंट करून 127 पिंक ट्रम्पेट झाडे वाचवण्यात आली. तसेच हजारो झाडांची लागवड करण्यात येईल. या मार्गासाठी प्राथमिक सर्व्हे, टेस्ट पाइल्स, भू-तांत्रिक तपासणी पूर्ण; पाइल आणि पियर कास्टिंग सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच या मार्गामुळे वेगवान आणि हरित प्रवास होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com