Health Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Health Tips : पान खाल्ल्यानंतर 'ही' चूक ठरू शकते आरोग्यास घातक

Shreya Maskar

रात्रीच्या जेवणानंतर पचन चांगले होण्यासाठी अनेक लोक बाहेर छान फेरफटका मारून येतात आणि मस्त विड्याच्या पानाचा आस्वाद घेतात. जेवल्यानंतर विड्याचे पानं खाल्ल्याने पचन सुरळीत होते. विड्याच्या पानामधील अँटीऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आजारांशी लढण्याची ताकद देतात.

जेवण झाल्यावर विड्याचे पानं खाण्याचे फायदे

पोटाचे आरोग्य सुधारते

रात्री जेवल्यावर विड्याचे पानं खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. या पानामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे बद्धकोष्ठता, ॲसिडीटीची समस्या उद्भवत नाही आणि पोटाला आराम मिळतो.

शरीराची सूज कमी

विड्याचे पानं खाल्ल्यामुळे शरीराची सूज कमी होते. दातांचे आरोग्य सुधारते. हिरड्यांची सूज कमी होते. दातातून रक्त येत असल्यास दातांना आराम मिळतो. दातांचा पिवळटपणा देखील कमी होण्यास मदत होते. पौष्टिक विड्याच्या पानांमुळे दातांचे दुखणे आणि दातांना कीड लागली असल्यास लवकर बरे वाटते.

संसर्गजन्य आजार

पावसाळ्यात सर्दी, खोकला, इन्फेक्शनचा त्रास आपल्याला वारंवार होत असतो. विड्याच्या पानाचे सेवन केल्यास आजारांपासून लढण्याची ताकद आपल्याला मिळते. तसेच विड्याच्या पानात मध मिसळल्यावर सर्दी, खोकल्याला आराम मिळतो. शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यास आजारांचा धोका वाढतो. यावर जर तुम्ही विड्याचे पानाचे सेवन केल्यास युरिक ॲसिड नियंत्रणात राहते. कधीही जेवल्यावर विड्याचे पानं खावे.

औषधी खाणे टाळा

तज्ञांच्या मते, तुम्ही एखाद्या आजाराचे औषध घेत असल्यास पान खाल्ल्यानंतर औषध घेणे टाळा. कारण यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होताना दिसतो. शरीराला संसर्ग होण्याचा धोका वाढतो. पान खाल्ल्यानंतर औषध घेतल्यामुळे डोकेदुखी, पोटदुखी उद्भवते. रात्री जेवल्यावर पानं खाल्ल्यास किमान १ ते २ तासांनी औषधे घ्यावी आणि भरपूर पाणी प्यावे.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक !

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

SCROLL FOR NEXT