Priya More
जेवल्यानंतर विड्याचे पान खायला किंवा अनेकांना रोज विड्याचे पान खायला प्रचंड आवडते.
रोज विड्याचे पान खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण काही लोकांनी पानाचे सेवन करू नये.
विड्याच्या पानांमध्ये असे केमिकल असते जे काही आरोग्याशी संबंधित समस्या असलेल्या लोकांना हानिकारक ठरू शकते.
ज्या व्यक्तींना जास्त घाम येतो त्यांनी विड्याचे पान अजिबात खाऊ नये.
ज्या व्यक्तींना डायबिटीजचा त्रास आहे अशांनी विड्याचे पान अजिबात खाऊ नये.
ज्या व्यक्तींना ब्लडप्रेशरचा त्रास होतो. त्यांनी देखील पान खाणे टाळावे.
ज्या व्यक्तींचे दान पिवळे होत आहेत. त्यांनी पान खाणे टाळावे. विड्याचे पान खाल्ल्यामुळे त्यांच्या दाताचा रंग अधिक पिवळा होतो.
ज्या महिलांना हार्मोनल इश्यू आहे त्यांनी विड्याचे पान खाणे टाळावे. कारण पान खाल्ल्यामुळे इस्ट्रोजेन हार्मोन कमी होऊ शकतात.
ज्या व्यक्ती कोणत्याही आजाराशी संबंधित औषधांचे सेवन करतात त्यांनी पान खाणे टाळावे.
जास्त विड्याची पानं खाणं शरीरासाठी घातक ठरु शकतात. सुपारी किंवा तंबाखूसारखे पदार्थ न टाकता नुसते पान खाणे चांगले असते.