Priya More
आजच्या धक्काधक्कीच्या आणि बदल्या जीवनशैलीमुळे अनेकांना वेगवेगळे आजार होताना दिसत आहे.
खराब जीवनशैलीमुळे डायबिटीजच्या रुग्णांच्या संख्येमध्ये सतत वाढ होत आहे.
डायबिटीजच्या रुग्णांना आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलाव्या लागतात. अशामध्ये या रुग्णांनी आंबा खावा की खाऊ नये असा प्रश्न अनेकांना पडतो.
डायबिटीजचा रुग्ण आंबा खाऊ शकतो. फक्त त्याला आंबा खाण्याच्या प्रमाणाकडे लक्ष द्यावे लागेल.
जर तुमच्या डायबिटीजची लेव्हल नेहमीच जास्त असेल तर तुम्ही आंबा खाणे टाळावे.
जर तुमचा डायबिटीज नियंत्रणात असेल तर तुम्ही कमी प्रमाणात आंबा खाऊ शकता.
डायबिटीजच्या रुग्णांनी आपल्या जेवणामध्ये आंब्याचा असा समावेश करायचा जेणे करुन त्याचा आरोग्यावर परिणाम होणार नाही.
डायबिटीजच्या रुग्णांनी मँगो शेक आणि मँगो ज्यूस पिऊ नये कारण त्यात जास्त प्रमाणात साखर असते.
आंब्यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. जे डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर असते.
आंब्याचे जास्त सेवन केल्यामुळे डायबिटीज नियंत्रणात आणण्यास समस्या निर्माण होते.