Men Health : पुरुषांची 'ही' एक चूक हृदयविकाराला कारणीभूत

Crying Health Benefits : आपल्या समाजात मुलं रडली तर त्यांना नाव ठेवली जातात. मात्र न रडल्यामुळे त्यांच्या हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि त्यांचे आरोग्य बिघडते. कारण चांगल्या आरोग्यासाठी हसण्यासोबत रडणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
Crying Health Benefits
Men HealthSAAM TV
Published On

आजकाल मुलांमध्ये हृदयविकाराच्या समस्या वाढत आहे. महिलांपेक्षा हृदयाचा त्रास पुरुषांना जास्त आहे. पुरुषांची एक चूक हृदयविकाराला कारणीभूत ठरते. ती म्हणजे अश्रू आवरून रडणे टाळणे. लहानपणापासूनच मुलांना तु रडायचे नाहीस, तु भक्कम आहेस. रडणे हे फक्त मुलींना शोभते. असे सांगितले जाते. यामुळे लहानपणापासून मुलं आपली दुख न रडता लपवत येतात.पण भविष्यात ही चूक आरोग्याला घातक ठरते.

आयुष्यात हसण्यासोबत योग्य वेळी रडणे देखील महत्वाचे आहे. यामुळे हृदयावर ताण येत नाही. कारण आपण जेव्हा एखादी गोष्ट मनात ठेवतो. याचा आपल्या मनाला त्रास होऊन हृदयावर ताण येतो. यामुळे पुरुषांमध्ये हृदयविकाराचा झटक्याचे प्रमाण जास्त आहे.

रडण्याचे फायदे जाणून घ्या

तणाव कमी

वेळच्या वेळी आपल्या भावना व्यक्त केल्यामुळे शरीरातील आपण रडत असताना आपल्या शरीरात कॉर्टिसॉल नावाची हार्मोनची पातळी संतुलीत राहते. ज्यामुळे आपल्याला ताण येत नाही. तसेच मानसिक आरोग्य देखील चांगले राहते. रडताना मोठ्या प्रमाणात मनातील भावना व्यक्त होतात. मनात साचलेले विचार आणि गोष्टी यांना मोकळी वाट मिळते. जड मन शांत होते. ज्यामुळे मनाला आणि मेंदूला आराम मिळतो.

हृदयाचे आरोग्य

मनसोक्त रडल्यामुळे शरीरातील ताण निघून जातो आणि नसांमधील रक्ताभिसरण सुरळीत होते. ज्यामुळे हृदय निरोगी राहते. आपल्या भावना मानात लपवून ठेवल्यास रक्तदाब वाढतो. परिणामी हृदयाचे ठोके वाढू लागतात. जे आरोग्यास घातक ठरतात.

Crying Health Benefits
Benefits Of walking On Grass : गवतावर अनवाणी चालण्याचे आश्चर्यकारक फायदे

डोळ्यांचे आरोग्य

डोळ्यातून ओघळणारे अश्रू हृदयाची आणि मनाची स्थिती दर्शवतात. रडल्यामुळे डोळ्यांच्या आत असलेले बॅक्टेरिया बाहेर पडतात. त्यामुळे डोळे स्वच्छ होऊन आपले अनेक आजारांपासून संरक्षण होते. नियमित डोळा कोरडा राहिल्यास डोळ्यांच्या त्वचेसाठी ते घातक ठरते. यामुळे कधीतरी भावना व्यक्त करण्यासाठी पुरुषांनीही रडावे.

चांगली झोप

अनेक पुरुषांना झोपल्यावर पटकन झोप लागत नाही. कारण त्यांच्या मनात असंख्य विचार चालू असतात आणि ते वेळच्या वेळी व्यक्त न झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागरण होते. रोजचा तणाव आणि मानसिक अस्वस्थतेमुळे रात्री लवकर झोप लागत नाही. पण जर तुम्ही रडलात तर मन मोकळे होऊन निवांत झोप लागते.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Crying Health Benefits
Tips For Wearing Contact Lenses : लेन्स लावताय? सावधान! वाढतोय डोळे गमवण्याचा धोका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com