हृदयविकार हा जगातला सर्वाधिक जीवघेणा आजार मानला जातो. जगभरात हृदयविकारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे. हृदयदाते कमी असल्यानं त्यासाठीची प्रतीक्षा यादीही मोठी आहे. ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीला हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता भासली. मात्र, त्याला वेळेवर हृदयदाता मिळाला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी त्या व्यक्तीला कृत्रिम हृदय बसवलं. विशेष बाब म्हणजे हा रुग्ण कृत्रिम हृदयाच्या साह्यानं 100 दिवस जगला; अन्यथा त्याचा मृत्यू झाला असता. कृत्रिम ह़दय कसं काम करत पाहूया...
- क्वीन्सलँडच्या डॉ. डॅनियल टिम्सकडून कृत्रिम हृदय विकसित
- हृदययंत्राला BiVACOR असं नाव
- जगातील पहिला इम्प्लांटेबल रोटरी ब्लड पंप
- पंपाचा आतील भाग टायटॅनियमचा
- हृदययंत्राची डिझाइन हुबेहूब रक्तवाहिन्यांप्रमाणे
- कृत्रिम हृदयात कोणतेही व्हॉल्व्ह किंवा यांत्रिक बेअरिंग नाही
आजवर कृत्रिम हृदय प्रत्यारोपणाचे अनेक प्रयोग करण्यात आले; पण ते अयशस्वी ठरल्याचं दिसून आलं. मात्र, ऑस्ट्रेलियातील डॉक्टरांनी असा दावा केला की, त्यांनी कृत्रिम टायटॅनियम हृदय बसवून एका रुग्णाला तब्बल १०० दिवस जिवंत ठेवलं आणि त्याचे प्राण वाचवले. त्यानंतर हृदयदाता मिळाल्यानं पुन्हा त्या रुग्णाला नैसर्गिक हृदय बसवण्यात आलं. या शस्त्रक्रियेनंतर हा रुग्ण ठणठणीत बरा होऊन रुग्णालयातून घरी परतलाय.
कृत्रिम हृदय 12 वर्षांच्या मुलाच्या शरीरातही बसवणं शक्य
कृत्रिम हृदयाला बाहेरून ऊर्जा पुरवठा
हृदययंत्राच्या चार्जिंगसाठी वायरची सोय
चार्जिंग करताना कमीत कमी आवाज, उष्णता निर्माण
एकदा हृदययंत्र चार्ज केल्यावर 4 तास चालतं
बॅटरी कमी झाल्यास यंत्राद्वारे सूचना
खरंच ऑस्ट्रेलियात घडलेली घटना विज्ञानाचा चमत्कार म्हणायचा का याबाबत आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या धुत हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ञ डॉ. रोहित वळसेंकडून माहिती घेतली...
हृदयविकार हा जगातला सर्वाधिक जीवघेणा आजार आहे. दरवर्षी जगातील 1.8 कोटी लोक हृदयविकारामुळे मृत्युमुखी पडतात. त्याशिवाय लाखो, करोडो लोक या व्याधीनं त्रस्त असतात. हृदय प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेमुळे त्यांचा जीव वाचू शकतो. सध्यातरी ऑस्ट्रेलियात हा प्रयोग यशस्वी झालायं मात्र भारतातही असं तंत्रज्ञान विकसित होईल का याची अनेकांना उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.