Heart attack: एक लस वाचवणार लाखो लोकांचा जीव; हार्ट अटॅकविरोधी लस कसं काम करणार पाहाच!

New vaccine for stroke and heart attack: हृदयविकाराचा झटका कधी आणि कसा येईल, याची कोणतीही निश्चितता नाही. दरवर्षी संपूर्ण जगभरात हृदयरोगामुळे सुमारे 1 कोटी 79 लाख लोकांचा मृत्यू होतो.
New vaccine for stroke and heart attack
New vaccine for stroke and heart attacksaam tv
Published On

हार्ट अटॅक रुग्णांची संख्या कमालीची वाढलीय. आपल्या शेजारी, नातेवाईकांमध्ये कोणाचा ना कोणाचा तरी हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याच्या बातम्या येतच असतात. मात्र आता या आजारावर एक रामबाण इलाज सापडल्याचा दावा करण्यात येतोय. हार्ट अटॅकवर लस तयार केल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

हार्ट अटॅक कधी, कसा आणि कुणाला येईल याचा नेम नाही. दरवर्षी जगभरात हार्ट अटॅकमुळे एक कोटी 79 लाख लोकांचा मृत्यू होतो. भारतातही हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही. एक लस हार्ट अटॅक पासून तुम्हाला दूर ठेवेल.

हार्ट अटॅकवर आली लस

हार्ट अटॅक आणि स्ट्रोक पासून बचाव करण्यासाठी चीनच्या संशोधकांनी हे इंजेक्शन तयार केल्याचा दावा करण्यात येतोय. याबाबतचा एक अहवाल जर्नल नेचरमधून प्रकाशित करण्यात आलाय. या अहवालात नेमकं काय म्हटले पाहूयात.

New vaccine for stroke and heart attack
Heart Attack : हार्ट अटॅक येण्याआधी शरीर देतं 7 संकेत, दुर्लक्ष कराल तर महागात पडेल

कशी काम करणार ही लस?

हार्ट अटॅक आणि स्ट्रोक्स पासून वाचण्यासाठी चीनच्या नानजिंग यूनिवर्सिटी ऑफ साइंस अँड टेक्नोलॉजीच्या संशोधकांनी लस शोधून काढलीय. रक्तात ब्लॉकेजेस तयार झाल्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे हार्ट अटॅक येतो. मात्र चिनी संशोधकांच्या दाव्यानुसार त्यांनी तयार केलेल्या लसीमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण घटतं. परिणामी रक्तात ब्लॉकेजेस तयार होत नाहीत. रक्त प्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा प्रश्नच येत

संशोधकांनी अलीकडेच या लसीची उंदरांवर चाचणीही घेतली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. संशोधनानुसार या लसीमुळे p 210 नावाचं प्रोटीन रोगप्रतिकारशक्ती सक्रिय करण्यासाठी उपयुक्त ठरल्याचं दिसून आलं. ज्या उंदरांवर लसीची चाचणी घेण्यात आली त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लांट जमा होऊ शकलं नाही. या इंजेक्शनमुळे कोट्यवधी रुग्णांना दिलासा मिळेल असा दावाही केला जातोय.

New vaccine for stroke and heart attack
Heart Blockage Signs: हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यावर शरीर देतं 'हे' संकेत; सामान्य समजून ९९% लोकं करतात दुर्लक्ष

भारतासारख्या देशात हृदयरोग एक मोठी समस्या बनत चाललीय. भारतातील हार्ट अटॅक रुग्णांची आकडेवारीही पाहूयात

  • भारतात सर्वाधिक हार्ट अटॅक रुग्ण

  • भारतात 3 कोटी हृदयविकाराचे रुग्ण

  • 27% लोकांचा हार्ट अटॅकनं मृत्यू

  • NCRBच्या रिपोर्टनुसार हार्ट अटॅकने मरण पावणाऱ्यांची संख्या 12% अधिक

  • 2022 मध्ये 56 हजार 450 लोकांचा हार्ट अटॅक मुळे मृत्यू

New vaccine for stroke and heart attack
World kidney day : महिलांमध्ये किडनीच्या आजारात वाढ; 'या' कारणांमुळे प्रमाण वाढत असल्याची तज्ज्ञांची माहिती

बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, जंक फूड, वाढतं टेन्शन अशा अनेक कारणांमुळे हार्ट अटॅक येऊन लोकांचा मृत्यू होतोय अशा कोट्यवधी रुग्णांसाठी ही लस म्हणजे संजीवनीच म्हणावी लागेल. अर्थात याबाबत आणखी मोठ्या प्रमाणात संशोधन होणंही तितकंच गरजेचं आहे. तसंच हार्ट अटॅक वरची लस प्रत्यक्षात माणसांसाठी कधी उपयोगात आणली जाईल याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाही. त्यामुळे हार्ट अटॅक वरील या लसीसाठी रुग्णांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com