ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलती जीवनशैली, वाढता ताण आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. हार्ट अटॅक येण्याआधी शरीर काही संकेत देत असतं यांना दुर्लक्ष करु नका.
जर तुम्हाला वारंवार छातीत वेदना होत असतील किंवा श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर याकडे दुर्लक्ष करु नका. हे हृदयाच्या नसांमध्ये ब्लॅाकेजचे लक्षण असू शकते.
कोणतेही जड काम न करताही दिवसभर थकवा जाणवत असेल तर हे हृदयाच्या कमकुवतपणाचे लक्षण असू शकते.
जर हलके काम करुनही श्वास घेण्याचा त्रास होत असेल तर ते हृदयाच्या आजाराचे लक्षण असू शकते.
हार्ट अटॅक येण्याआधी काही लोकांना मान, जबडा आणि पाठदुखीचा त्रास होतो. याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरु शकते.
जर तुम्हाला वारंवरा चक्कर येत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर त्वरित डॅाक्टरांशी संपर्क साधा.
जर हात पाय विनाकारण सूजत असतील तर हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं.
जर कोणतेही काम न करता जास्त प्रमाणात घाम येत असेल त हे हार्ट अटॅक येण्याआधीचे मुख्य लक्षण आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.