back pain yandex
लाईफस्टाईल

Winter Health Care: हिवाळ्यात पाठदुखी-मणक्याच्या समस्या सतावतायत? डॉक्टरांनी दिलेल्या या टीप्स वाचाच

Winter Health Care Tips: थंडीच्या मोसमात अचानक घसरणे आणि पडणे सामान्य आहे ज्यामुळे मणक्याशी संबंधित समस्या उद्भवतात. या काळात कशी काळजी घेतली पाहिजे यासाठी डॉक्टरांनी आपल्याला टीप्स दिल्या आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

हिवाळ्याच्या दिवसामध्ये मणक्याशी संबंधित दुखापत आणि पाठीच्या समस्यांचा धोका वाढतो. हे मुख्यतः थंड हवामानामुळे होतं असं तज्ज्ञांचं मत आहे. हवामानातील थंडपणा तुमच्या स्नायूंमध्ये कडकपणा निर्माण होतो. ज्यामुळे सांध्यांची लवचिकता कमी होऊ शकते. यामुळे हिवाळ्यात सांध्यांवर ताण आणि दुखापतीची शक्यता वाढते. थंडीच्या मोसमात अचानक घसरणे आणि पडणे सामान्य आहे ज्यामुळे मणक्याशी संबंधित समस्या उद्भवतात.

ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन डॉ आयुष शर्मा यांनी सांगितलं की, थंड तापमान तुमच्या शारीरिक हालचालींवर परिणाम करतं. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर ब्लँकेटमध्ये झोपून राहण्याचा मोह होतो. यामुळे शारीरीक गती मंदावते. दिवसभर एकाच स्थितीत बसणं हे तुमच्या मणक्याच्या समस्येसाठी कारणीभूत ठरतं. किरकोळ गैरसोय म्हणून मणक्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर गुंतागुंत होऊ शकते. या जखमांमुळे तुमच्या शारीरिक आरोग्यावरच परिणाम होत नाही तर दैनंदिन कामावरही परिणाम होतो. मणक्याच्या समस्यांवर वेळीच उपचार न केल्या तीव्र वेदना, हालचालींवर मर्यादा येणे आणि दीर्घकालीन पाठीच्या समस्या होऊ शकतात.

हिवाळ्यात मणक्याच्या दुखापती टाळण्यासाठी टिप्स

योग्य शारीरीक स्थिती न राखल्याने तुमच्या मणक्याला हानी पोहोचू शकते परिणामी तीव्र वेदना किंवा दुखापत होऊ शकते. तुम्ही योग्य मुद्रा बाळगाल याची खात्री करा आणि खांदे झुकवून बसणे किंवा कुबड काढणे टाळा. तुमची पाठ सरळ आणि खांदे आरामशीर ठेवा. अर्गोनॉमिक खुर्च्या वापरणे तुमच्या मणक्याच्या आरोग्यासाठी योग्य राहील.

शारीरिकदृष्ट्या एक्टिव्ह राहा

हिवाळ्यात बाहेरील थंड तापमानामुळे शारीरीक गती कमी होते. यामुळे पाठीचे स्नायू कमकुवत होतात. स्ट्रेचिंग, कार्डिओ, चालणे किंवा योगासने यासारखे हलके व्यायाम करून शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे हे तुमच्या पाठीची लवचिकता राखण्यास उपयुक्त ठरते.

तुमच्या स्नायूंना बळकट करा

स्नायु कमकुवत होणं टाळण्यासाठी, तुमच्या दैनंदिन दिनचर्येत अधिक स्नायु बळकट करणारे व्यायाम समाविष्ट करा. हे तुमचे स्नायू मजबूत करण्यास, संतुलन राखण्यास आणि दुखापतींचा धोका कमी करण्यात मदत करू शकते.

जास्त वेळ एकाच ठिकाणी बसणे टाळा

काम करताना एकाच ठिकाणी जास्त वेळ बसणे टाळा. एका जागी जास्त वेळ बसल्याने तुमच्या मणक्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. तुमची शारीरक मुद्रा चांगली राखण्यासाठी तुम्ही दिवसभरात विश्रांती घेत असल्याची खात्री करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics: 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही...', माणिकराव कोकाटेंचे खळबळजनक विधान

'फक्त सांगा कोणती मुलगी पाठवू'; भाजप महिला नेत्याचा सेxx स्कँडलचा पर्दाफाश, नेत्यांना पुरवते परदेशी तरूणी

Bajra Soft Bhakri Tips: बाजरीची भाकरी थापताना तुटते? फुगतच नाही? '१' भन्नाट Idea, सॉफ्ट भाकरीचं सिक्रेट

Zarine Khan Funeral : जरीन खान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आईला अखेरचा निरोप देताना लेक ढसाढसा रडला, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT