
वाढत्या वयात कॅन्सरचा धोका वाढतो, असं अनेक रिसर्चनुसार समोर आलं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कारण वाढत्या वयाबरोबर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत जाते. संशोधनातून असेही समोर आलंय की, कालांतराने पेशींमध्ये अनेक अनुवांशिक बदल होतात आणि या अनुवांशिक समस्या हळूहळू जमा होऊ लागतात. यामुळे कॅन्सरच्या पेशी निर्माण होण्याचा धोका असतो.
दरम्यान 'मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर' मधील संशोधकांनी फुफ्फुसाच्या कॅन्सरचं माऊस मॉडेल वापरून नवीन संशोधन केलंय. या संशोधनामधून असं लक्षात आलंय की, म्हातारपणी कॅन्सरचा धोका प्रत्यक्षात कमी होतो. इतर अनेक कॅन्सरप्रमाणे फुफ्फुसाच्या कॅन्सरवरही साधारणपणे ७० वर्षांच्या आसपास उपचार कसे केले जातात. याबाबत डॉ. झुकियान झुआंग यांनी माहिती दिली. 80 किंवा 85 वर्षांच्या वयापर्यंत याची शक्यता कमी होते.
हे असं का घडतं हे दाखवण्यासाठी आमचं संशोधन मदत करतं. वाढत्या वयामुळे कोशिकांना नव्या पेशी बनवसाठीची क्षमता गमावतात आणि म्हणूनच कॅन्सरची वाढ कमी होते. डॉक्टरांच्या टीमने हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, कॅन्सरचं प्रमाण लवकर वृद्धापकाळाच्या सुरुवातील का वाढतं आणि नंतर त्यामध्ये घट का होते. यावेळी फुफ्फुसाच्या एडेनोकार्सिनोमाचे अनुवांशिकरित्या सुधारित माऊस मॉडेल वापरलं. हा एक सामान्य फुफ्फुसाचा कॅन्सर होता आहे जो जागतिक कॅन्सरच्या मृत्यूंपैकी सुमारे 7% साठी जबाबदार धरला जातो.
मॉडेलमध्ये वृद्धत्वाचा अभ्यास करणं आव्हानात्मक आहे, कारण मानवांमध्ये 65 ते 70 वर्षे वयापर्यंत पोहोचण्यासाठी उंदरांना दोन वर्षे लागतात. ही गोष्ट वेळेसाठी खर्चिक असून भरपूर संसाधनांची आवश्यकता आहे, असं संशोधकांचं मत आहे.
हा परिणाम उलट करता येण्यासारखा असल्याचंही आढळून आले. वृद्ध उंदरांना अतिरिक्त आयर्न देणं किंवा त्यांच्या पेशींमध्ये NUPR1 ची पातळी कमी केल्याने त्यांची Regenerative क्षमता पुनर्संचयित झालीये. कोविड-19 च्या इन्फेक्शनंतर फुफ्फुसं संसर्ग किंवा इतर कोणत्याही कारणामुळे लोकं पूर्णपणे बरे झालेले नाहीत.
उंदरांवरील आमच्या प्रयोगांने हे दाखवून दिलंय की, आयर्न दिल्याने फुफ्फुसांचं Regeneration होण्यास मदत होते आणि फुफ्फुसात थेट औषधं पोहोचवण्याचे खूप चांगले मार्ग आहेत. ही क्षमता कर्करोग रोखण्यास मदत होते देखील वाढू शकते. त्यामुळे कर्करोगाचा धोका जास्त असलेल्या व्यक्तींसाठी ते योग्य ठरणार नाही, असे डॉ. टॅमेला यांनी सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.