Intermittent Fasting: स्लिम-ट्रीम होण्याच्या नादात टकले व्हाल; डाएटच्या भानगडीत पडण्यापूर्वी हे संशोधन पाहा

Weight loss: तुम्हीही इंटरमिटेंट फास्टिंग (IF) करत असाल तर सावध व्हा. याचं कारण म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंगमुळे तुम्ही टकले होऊ शकता. एका संशोधनातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे..
Intermittent Fasting
Intermittent Fastingsaam tv
Published On

चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे वजन वाढण्याची समस्या अनेकांमध्ये दिसून येतेय. हे वजन कमी करण्यासाठी आपण विविध पद्धतींचा अवलंब करतो. यामध्ये इंटरमिटेंट फास्टिंग (IF) चा पर्यायही अनेकजण निवडतायत. तुम्हीही इंटरमिटेंट फास्टिंग (IF) करत असाल तर सावध व्हा. याचं कारण म्हणजे डाएटच्या या प्रकारामुळे तुम्ही टकले होऊ शकता.

लाखो लोक वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग (IF) चा अवलंब करतात. पण याचे काही आरोग्यदायी फायदे असण्यासोबतच वाईट परिणाम देखील होऊ शकतात. डाएटमुळे डोक्यावरील केसांच्या वाढीवर परिणाम होतो आणि केस गळू शकतात, असा धक्कादायक खुलासा नुकत्याच झालेल्या चिनी अभ्यासातून झाला आहे.

Intermittent Fasting
Liver Cirrhosis: कोणत्या आजारामुळे तुमचं यकृत सडू लागतं? शरीरात दिसतात 'हे' बदल, वेळीच लक्ष द्या

हे संशोधन चीनच्या झेजियांग विद्यापीठातील अभ्यासकांनी केलंय. ज्यामध्ये असं आढळून आलं की, अधूनमधून उपवास केल्याने उंदरांच्या केसांची वाढ मंदावते. संशोधकांच्या मते, ही प्रक्रिया शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे होते. ज्यामुळे केसांच्या स्टेम सेलवर (HFSCs) विपरित परिणाम होऊ लागतो.

Intermittent Fasting
प्रजनन उपचार करण्यापूर्वी महिलांनी कशी तयारी करावी; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

संशोधनातून काय आलं समोर?

या अभ्यासातून असंही समोर आलंय की, उंदरांना काही दिवस अधूनमधून उपाशी ठेवल्याने सामान्य आहार घेतलेल्या उंदरांच्या तुलनेत त्यांच्या केसांची वाढ कमी होते. अधूनमधून उपाशी असलेल्या उंदरांचे केस ९६ दिवसांतही पूर्णपणे वाढले नाहीत. तर सामान्य आहार असलेल्या उंदरांचे केस ३० दिवसांत पुन्हा वाढले असल्याचं समोर आलं.

Intermittent Fasting
प्रजनन उपचार करण्यापूर्वी महिलांनी कशी तयारी करावी; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मानवी शरीरावर कसा होणार परिणाम?

या अभ्यासाचा मानवी शरीरावर काय परिणाम होऊ शकतो, हे देखील तज्ज्ञांनी जाणून घेतलं आहे. यासाठी 49 निरोगी प्रौढांवरही प्राथमिक चाचणी घेण्यात आली. या चाचणीत 18 तास उपवास करणाऱ्या सहभागींनी केसांच्या वाढीचा वेग 18 टक्क्यांनी कमी झाल्याचं पहायला मिळालं. हा परिणाम उंदरांच्या तुलनेत कमी असला तरी इंटरमिटेंट फास्टिंग परिणाम मानवांवर देखील होऊ शकतो.

Intermittent Fasting
Winter Health Care : कडाक्याची थंडी ठरू शकते धोकादायक, डॉक्टरांनी दिला हा सावध इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com