Vastu Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips: घरात सतत भांडणं आणि मतभेद वाढतायत? वास्तूशी संबंधित हे उपाय नक्की करा

Vastu Tips to Protect Evil Eye: आजकाल अनेक घरांमध्ये वाद, मतभेद आणि तणाव वाढताना दिसतो. यामागे मानसिक कारणे असली तरी वास्तुशास्त्रानुसार घरातील चुकीची रचना किंवा वास्तु दोष देखील यासाठी जबाबदार असतात.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या प्रत्येकाला वाटतं की, घरात शांती राहावी. मात्र अनेकदा घरात सतत भांडणं होतात. याचं कारण आपल्याला कळत नाही. इतकंत नाही तर अनेक घरांमध्ये पैशांची सतत नासाडी होते, वातावरण गंभीर असतं आणि कुटुंबातील सदस्य सतत तणावात असतात. याशिवाय कुटुंबातील सदस्य आजारी पडत राहतात, मतभेद किंवा आर्थिक समस्या सुटत नाहीत.

जर कुटुंबातील सदस्य मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असतील तर घराची वास्तू योग्य नसू शकते. अशा परिस्थितीत, काही विशेष उपाय केल्याने या समस्या कमी होऊ शकतात. तुमच्या घरासाठी कोणते उपाय प्रभावी ठरू शकतात ते जाणून घ्या.

शुभ चिन्ह

जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक, ओम किंवा इतर शुभ चिन्ह कुंकुचा वापर करून काढले तर घरात सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होते. यामुळे नकारात्मक शक्ती घराला स्पर्शही करू शकणार नाहीत.

काळा धागा

जर तुम्ही घरातील मुख्य दाराच्या हँडलला काळा धागा बांधलात तर नकारात्मक उर्जा घरात प्रवेश करू शकत नाही. यामुळे घरातील वातावरण चांगलं राहतं.

लिंबू-हिरवी मिर्ची

मुख्य दारावर एक लिंबू आणि सात हिरव्या मिरच्या लटकवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही असं म्हटलं जातं. हा उपाय फक्त शनिवारी किंवा मंगळवारी करा.

मोरपंख

जर तुम्ही लिविंग रूममध्ये किंवा मुख्य प्रवेशद्वारावर तीन मोराचे पंख ठेवले तर घरावर कधीही वाईट नजर लागणार नाही. यामुळे घरात नेहमीच सकारात्मक ऊर्जा राहण्यास मदत होते.

मीठ आणि तुरटी

वास्तुशास्त्रात मीठ आणि तुरटीचा वापर करून अनेक उपाया केले जाऊ शकतात. हे दोन्ही घटक नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि घर सुरक्षित ठेवतात. आठवड्यातून दोनदा घर पुसताना, पाण्यात चिमूटभर सैंधव मीठ घाला. दुसरा उपाय म्हणजे बाथरूमच्या एका कोपऱ्यात एका काचेच्या भांड्यात फिटकरी ठेवा. यामुळे घराला वाईट नजर लागत नाही.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

ZP Election : मोठी बातमी! ठाकरे-शिंदेंच्या शिवसेनेची इथं झाली युती, राज्यातील पहिला प्रयोग

Sunday Mega Block : विकेंडला घराबाहेर फिरायला जात असाल तर थांबा; 'या' मार्गावर रविवारी असणार मेगा ब्लॉक, वाचा वेळापत्रक

Traffic Rules: वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी! ५ वेळा नियम मोडला तर परवाना रद्द

Romantic Destination: लग्नानंतर जोडीने महाराष्ट्रातील 'या' प्रसिद्ध ठिकाणांना द्या भेट, रोमॅटिक मूड होईल फ्रेश

SCROLL FOR NEXT