Apple Smartwatch Watch Blood Sugar Monitoring Feature : अॅपल वॉच (Apple Watch) मध्ये आता घरबसल्या ब्लड शुगर लेवल तपासू शकता. नॉन इन्फेसीव ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग फीचर आता विकसित होणार आहे. अॅपल कंपनीने हे काम अनेक वर्षांपासून सुरु केले आहे. अजुनही अॅपल कंपनी यावर काम करत आहे. हे वॉच तयार व्हायला आणखी काही वर्षे लागण्याची शक्यता आहे. हे यंत्र तुमचा रक्तदाब अचूक आकड्यांनी दर्शवला जाणार आहे. तसेच तुमच्या आरोग्यासाठी हे वॉच खूप फायदेशीर ठरणार आहे.
Apple Watch कसे काम करेल?
पेटंटच्या माहितीनुसार, अॅपल वॉचच्या पट्ट्यांमध्ये एक पंप, हवा भरण्याचे चेंबर आणि लिक्विडने भरलेले सेंसर चेंबर असेल. त्यासोबत वायब्रेशन आणि प्रेशर मोजणारे सेंसर असणार आहे. याशिवाय हे यंत्र तुम्ही कोणत्याही डिव्हाइसमध्ये ठेवून वापरू शकता. मात्र हे यंत्र फक्त अॅपलच्याच वॉचमध्ये असण्याची शक्यता आहे. त्याने तुम्ही ब्लड प्रेशरचा आकडा तपासू शकता. या प्रोजेक्टचे कोडनेम 'Project E5' असे आहे. यामध्ये ऑप्टिकल सेसंर्सचा वापर करून त्वचेतून लाइट सोडून ग्लुकोजचे प्रमाण मोजले जाईल. हेच यंत्र तुम्हाला वॉचमध्ये वापरता येणार आहे. यावरच सध्या काम सुरु आहे.
अॅपलच्या कंपनीला Apple Watch बनवताना अनेक अडचणींचा सामना केला आहे. सध्या ब्लड शुगर मॉनिटरींग फीचर अनेक वर्षांपासून विकसित केले जात आहे. मात्र, पत्रकार मार्क गुरमन यांच्या मते, हे फीचर अजून काही वर्षे या फीचर्सवर काम करावे लागणार आहे. त्यासोबतचे अॅपलचे विविध आरोग्यविषयक फीचर्स योग्य रित्या काम करत आहेत. कंपनी iPhone वर ''व्हर्च्युअल हेल्थ कोच'' फीचर विकसित करत आहे. यामध्ये तुम्ही AI चा वापर करून आरोग्याशी संबधित सल्ले वापरू शकणार आहात.
अॅपलचे संस्थापक Steve Jobs जेव्हा कार्यकाळात होते. साधारण २०१० मध्ये या प्रोजेक्टचे काम सुरु झाले आहे. सुरुवातीला Rare Light नावाच्या ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग स्टार्टअपला खरेदी केले होते. त्यानंतर या प्रोजेक्टवर गुप्तपणे काम सुरु केले. या प्रोजेक्टचे कोडनेम 'Project E5' असे आहे.
Edited By: Sakshi Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.