Apple Samsung Devices on High-Risk Saam TV
लाईफस्टाईल

Apple Samsung Devices on High-Risk : संवेदनशील डेटा धोक्यात? ॲपल, सॅमसंग यूजर्ससाठी सरकारकडून अलर्ट जारी

प्रविण वाकचौरे

Apple, Samsung Smartphones :

अॅपल, सॅमसंगसह अनेक मोठ्या कंपन्या त्यांचे स्मार्टफोन सुरक्षित करण्यासाठी वेळोवेळी मंथली सिक्युरिटी पॅच जारी करत असतात. तरीदेखील अनेक iOS आणि Android डिव्हाइस धोक्यात आहेत. सरकारने अॅपल आणि सॅमसंग या दोन्ही कंपन्यांच्या स्मार्टफोन यूजर्ससाठी हाय रिस्क सिक्युरिटी अलर्ट जारी केला आहे.

इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने या आठवड्यात Apple आणि Samsung स्मार्टफोनमधील गंभीर त्रुटींवर बोट ठेवलं आहे. काही त्रुटींमुळे यूजर्सचा संवेदनशील डेटा धोक्यात येऊ शकतो. News 24 ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. (Latest Marathi News)

अॅपलची कोणती डिव्हाईस धोक्यात?

नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अॅडव्हायझरीमध्ये, CERT-In ने Apple डिव्हाईसमध्ये अनेक त्रुटी लिस्ट केल्या आहेत. आयफोन, आयपॅड, मॅक, अॅपल टीव्ही, अॅपल वॉच आणि सफारी वेब ब्राउझरवर या त्रुटींचा परिणाम होत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

CERT-In ने Apple डिव्हाइसमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत, ज्याद्वारे तुमच्या डिव्हाइसमधील संवेदनशील डेटामध्ये सहज हॅक जाऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत नोडल सुरक्षा एजन्सीने याबाबत इशारा दिला आहे की, CVE-2023-42916 आणि CVE-2023-42917 या दोन त्रुटींचा हॅकर्स फायदा घेऊ शकतात. हे टाळण्यासाठी यूजर्सनी त्यांचे डिव्हाइस शक्य तितक्या लवकर अपडेट करावेत.

सॅमसंगचे प्रोडक्टदेखील धोक्यात

यापूर्वी CERT-In ने सॅमसंग उपकरणांसाठी एक इशारा दिला होता. ज्यामध्ये Android व्हर्जन 11, 12, 13 आणि 14 वर चालवणार्‍या सॅमसंग डिव्हाईससाठी हाय सिक्युरिटी रिस्क अलर्ट जारी केला आहे. ज्याद्वारे हॅकर्सना सिक्युरिटी रेस्ट्रिक्शन्सना बायपास करने आमि संवेदनशील माहितीपर्यंत पोहोचण्यास मदत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT