साधा ताप, सर्दी किंवा खोकला झाला की अनेकदा आपण डॉक्टरकडे जाण्यापेक्षा अँटीबायोटिक घेऊन शांत बसतो. अनेकदा डॉक्टर लगेच अँटीबायोटिक औषध देतात आणि त्याने आपल्याला आरामही मिळतो. पण एक दिवस याच औषधांनी पूर्णपणे काम करणं बंद केली तर? ही शक्यता आता वास्तवात बदलताना दिसतेय.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, जगातील प्रत्येक 6 पैकी 1 बॅक्टेरियल संसर्ग असा झाला आहे ज्यावर अँटीबायोटिक औषधे प्रभावी राहत नाहीत. म्हणजेच अनेक रुग्णांवर औषधांचा काहीही परिणाम होत नाही आणि उपचार करणं अधिकाधिक कठीण होताना दिसतंय. ही अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि यालाच अँटीबायोटिक प्रतिरोध (Antibiotic Resistance) म्हणतात.
लोक अनेकदा डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःच अँटीबायोटिक घेतात किंवा पूर्ण कोर्स न करता मध्येच थांबवतात. अशावेळी बॅक्टेरिया पू्र्णपणे मरत नाही उलट अधिक मजबूत होतो. ज्यावेळी हा बॅक्टेरिया अँटीबायोटिकच्या विरोधात शक्तिशाली होतो तेव्हा त्याला मारणं खूप अवघड होतं.
आजार दीर्घकाळ राहतो
रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं
उपचारांचा खर्च वाढतो
दरवर्षी जगभरात 12 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू अँटीबायोटिक्समुळे होतो. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, 2050 पर्यंत हा आकडा दरवर्षी 1 कोटी मृत्यूपर्यंत पोहोचू शकणार आहे.
WHO च्या मते, खालील संसर्गांवर अँटीबायोटिक औषधं वेगाने निष्प्रभ होत आहेत:
युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन
ब्लड इन्फेक्शन
फुफ्फुसांचा संसर्ग
त्वचेचं संक्रमण
ड्रग-रेझिस्टंट टीबी
विशेषतः दक्षिण आशिया आणि पूर्व भूमध्यसागरीय प्रदेशांमध्ये ही समस्या सर्वाधिक गंभीर आहे. यामध्ये प्रत्येक तीनपैकी एक संसर्ग आता सामान्य अँटीबायोटिकने बरा होत नाही.
जर अँटीबायोटिक औषधं पूर्णपणे काम करेनाशी झाली तर परिस्थिती अत्यंत धोकादायक होईल-
यावेळी सर्जरी करणं धोकादायक ठरेल
प्रेग्नन्सी आणि प्रसूती दरम्यान इन्फेक्शनमुळे जीवाला धोका वाढेल
कॅन्सरच्या रुग्णांना केमोथेरपीनंतर इन्फेक्शन होऊन मृत्यू होण्याचा धोका वाढेल
साधे आजार जसं टायफॉईड, निमोनिया सुद्धा जीवघेणं बनेल
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.