Summer Care Tips : या 5 पदार्थांच्या सेवनाने शरीरात वाढते उष्णतेचे प्रमाण ! वेळीच थांबा नाहीतर जडतील अनेक आजार

Ayurvedic Tips : कुणाला थंडगार आइस्क्रिम खायला आवडते तर कुणाला वेगवेगळ्या फळांचे ज्यूस ट्राय करायचे असतात.
Summer Care Tips
Summer Care TipsSaam Tv

5 cool foods that increase heat inside your body : उन्हाच्या झळा वाढू लागल्या की सर्वांना आठवण येते ती थंडगार आइस्क्रीम आणि ज्यूसेसची. कुणाला थंडगार आइस्क्रिम खायला आवडते तर कुणाला वेगवेगळ्या फळांचे ज्यूस ट्राय करायचे असतात, तर कोणाला त्याच फळांच्या सॅलेडचा आस्वाद घ्यायला आवडतो.

उन्हाळ्याच्या दिवसांत हे सर्व पदार्थ जरी खायला चविष्ट आणि शरीराला शांत करणारे असले तरी ही वरवर वाटणारी शांतता शरीराच्या आत मात्र उष्णता निर्माण करण्याचे काम करते. आयुर्वेदात अशी अनेक फळे आहेत शरीराला शांत करण्याऐवजी उष्णता वाढवण्याचे काम करतात. त्यासाठी कोणते पदार्थ खाल्याने शरीरात उष्णता वाढते जाणून घेऊया

Summer Care Tips
Diabetes Control In Summer Season : उन्हाळ्यात शुगर लेव्हल खरेच वाढते का? जाणून घ्या डॉक्टरांकडून, लगेच होईल कंट्रोल

1. बर्फाचे पाणी (Water)

उन्हाळ्यात फ्रीज मधील बर्फाचे पाणी जरी शरीराला गारवा देणारे वाटत असले तरी, आयुर्वेदात मात्र थंड पाणी शरीरासाठी थंड मानले जात नाही. बर्फाचे पाणी पाचक अग्नीस प्रवृत्त करते ज्यामुळे शरीरातील पोषक तत्त्वे शोषून घेणे शक्य होत नाही.

2. दही

दही (Yogurt) हा जरी एक थंड पदार्थ असला तरी तो पचनास जड आहे. तसेच आयुर्वेदात दह्याला 'अभिषयंदी' म्हटले जाते. ज्यामुळे ब्लॉकेज होण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांत पाचक अग्नी नैसर्गिकरित्याच कमकुवत असतो त्यामुळे दही खाल्याने अपचन, सूज येणे, आणि शरीर जड होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Summer Care Tips
Summer Skin Care Tips: उन्हामुळे चेहरा काळवंडला? तर घरीच तयार करा डी-टॅन फेसपॅक, त्वचा उजळण्यास होईल मदत

3. आइस्क्रीम (Ice Cream)

उन्हाळ्यात लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या मणसांपर्यंत खाल्ले जाणारे 'आइसक्रीम' वरवर जरी थंड वाटत असले तरी त्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर, फॅट आणि पचनासाठी जड असे अनेक पदार्थ असतात. ज्यामुळे शरीरात उष्णतेचे प्रमाण सहज वाढू शकते. आइस्क्रीमुळे पाचक अग्नी कमजोर होऊन पचनक्रिया मंदाऊ शकते. ज्यामुळे शरीरात टॉक्सिन्स तयार होऊ शकतात आणि अपचनामुळे अस्वस्थतता, सुस्ती आणि शरीर जड वाटू शकते.

4. लिंबू

लिंबू हे आयुर्वेदामध्ये अधिक गुणकारी मानले गेले आहे पण काही परिस्थितींत मात्र हे खाण्याचा सल्ला दिला जात नाही. लिंबूमध्ये 'क' जीवनसत्त्व असते आणि हे एक थंड पदार्थ म्हणून ओळखले जाते. परंतु त्याच्या आंबट चवीमुळे ते पाचक अग्नीला मदत करते व शरीरात उष्णता वाढवते. त्यामुळे प्रामुख्याने ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे त्यांना उन्हाळ्यात लिंबू गरम पडू शकते आणि पित्त आणखी वाढू शकते ज्यामुळे अॅसिडीटी, छातीत जळजळ आणि त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Summer Care Tips
Rutuja Bagwe : ऋतूजाचे फोटो पाहून म्हणाल ही मराठीची दीपिकाच !

5. टोमॅटो

आयुर्वेदानुसार, टोमॅटो गरम पदार्थ आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांत त्याचे सेवन योग्य मानले जात नाही. विशेषतः पित्ताचा त्रास आहे आणि पित्त असंतुलित असण्याच्या समस्या आहेत अशा व्यक्तींसाठी टोमॅटो गरम ठरतो. टोमॅटोमध्ये किंचीत अम्लीय चव असते जी शरीरातील पित्त आणि गरमी वाढवण्याचे काम करते. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात टोमॅटोच्या अतिसेवनाने पित्त वाढून अपचन, छातीत जळजळ, त्वचेवर पूरळ येणे, सूज यांसारख्या समस्यांचे कारण ठरु शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com