Summer Skin Care Tips: उन्हामुळे चेहरा काळवंडला? तर घरीच तयार करा डी-टॅन फेसपॅक, त्वचा उजळण्यास होईल मदत

Homemade D-Tan Face Pack: रखरखत्या उन्हामुळे अधिकतर चेहऱ्याचे तेज कमी होऊ लागते आणि टॅनिंग ही मोठी समस्या होऊन बसते.
Summer Skin Care Tips
Summer Skin Care TipsSaam Tv

D-Tan Face Pack : उन्हाळा आला की, आपल्या राहाणीमानात आणि आहारात फार बदल होतो. हिवाळा संपताच आपण गरम कपडे आणि तेलकट पदार्थ मागे सारुन सुती कपडे आणि हलक्या आहाराकडे वळतो. या ऋतुत सर्व आपल्या तब्येतीची विशेष काळजी घेतात तसेच आपल्या आहारात बदल करतात.

याकाळात अनेकदा पौष्टिक आहारात (Food) करण्यावर भर दिला जातो. आरोग्याबरोबरच याकाळात त्वचेची देखील विशेष काळजी (Care) घ्यावी लागते. रखरखत्या उन्हामुळे अधिकतर चेहऱ्याचे तेज कमी होऊ लागते आणि टॅनिंग ही मोठी समस्या होऊन बसते.

Summer Skin Care Tips
Men Skin Care : पुरुषांनो, उन्हाळ्यात चेहरा आकर्षित करण्यासाठी अशी घ्या त्वचेची काळजी

अशातच चेहऱ्याचे (Skin) तेज आणि टॅनिंग कमी करण्यासाठी खुप लोक अनेक प्रकारचे ब्यूटी प्रोडक्ट्स वापरतात, पण त्यांचा वापर करुनही चेहऱ्याचे हरवलेले तेज काही परत येत नाही. अनेकदा त्याचा उलट परिणाम झालेला पाहायला मिळतो. जर तुमच्याही चेहऱ्याचे तेज टॅनिंगमुळे कमी झाले असेल, तर हे दोन घरगुती फेस पॅक तुमचं हरवलेलं तेज परत मिळवण्यास नक्कीच उपयुक्त ठरतील.

चला पाहुयात या घरगुती डी-टॅन फेस पॅक बनवण्याची कृती:

1. पपई (Papaya) डी-टॅन फेस पॅक

साहित्य

 • अर्ध केळं

 • एक तुकडा पपई

 • अर्धा बटाटा

 • अर्धा लिंबू

 • दोन टेबलस्पून बेसन

 • एक चमचा दही

 • एक टेबलस्पून कोरफड जेल

कृती

 • पपई डी-टॅन फेस पॅक तयार करण्यासाठी सर्व प्रथम पपई व वरील साहित्य मिक्सरमध्ये वाटून त्याचे मिश्रण तयार करा.

 • तयार केलेले मिश्रण छोट्या भांड्यात काढून घ्या.

 • पपईपासून बनवलेला घरगुती डी-टॅन फेस पॅक तयार आहे.

Summer Skin Care Tips
Skin Glowing Tips : त्वचेचा पोत सुधारण्यासाठी फायदेशीर ठरेल मसूरची डाळ, या पद्धतीने लावल्यास चेहरा अधिक उजळेल

फेस पॅक लावण्याची पध्दत

 • डी-टॅन फेस पॅक लावण्यासाठी तुम्ही ब्रशचा वापर करु शकता.

 • ब्रशच्या मदतीने फेस पॅक चेहऱ्यापासून मानेपर्यंत व्यवस्थित लावून घ्या.

 • आता 15 मिनीटं पॅक सुकू द्या.

 • यानंतर पॅकला केळ्याच्या सालीने हलक्या हातांनी चोळून स्वच्छ करा.

 • स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्या. आठवड्यातून किमान दोन वेळा पॅकचा वापर केल्याने चेहरा उजळायला लागेल.

 • तसेच या फेस पॅकच्या मदतीने चेहऱ्यावरील पिंपल्सचे डागही हलके होऊ लागतील.

2. टरबूज डी-टॅन फेस पॅक

साहित्य

 • 1 मोठा चमचा टरबूज

 • 1 छोटा चमचा टरबूजाच्या बिया

 • 1 छोटा चमचा मध

कृती

 • सर्वप्रथम टरबूजातल्या बिया काढूण वेगळ्या करा.

 • आता टरबूज आणि त्याच्या बिया वेगवेगळ्या बारीक करून घ्या.

 • यानंतर एका भांड्यात टरबूज, टरबूजाच्या बियांची पेस्ट आणि मध मिक्स करुन घ्या.

 • टरबूजापासून बनवलेला घरगुती डी-टॅन फेस पॅक तयार आहे.

Summer Skin Care Tips
Kriti Sanon : है रूप में इतना सादापन, तो कितना सुंदर होगा मन...

फेस पॅक लावण्याची पध्दत

 • तयार फेस पॅक ब्रशच्या मदतीने चेहरा आणि मानेवर लावावा.

 • फेसपॅक लावल्यानंतर २० मिनिटे सुकू द्यावा.

 • 20 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. हा फेस पॅक दर पाच दिवसांतून एकदा वापरल्यास तुम्हाला फरक जाणवेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com