Lamb's Quarters yandex
लाईफस्टाईल

Lamb's Quarters: चाकवताची भाजी खाण्याचे जबरदस्त फायदे जाणून घ्या

Lamb's Quarters Dish: चाकवताच्या भाजीमध्ये रक्त शुद्ध करण्याचे घटक असतात. चाकवताच्या भाजीत जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, फायबर, अँटिऑक्सिडंट्स असतात. याचा आहारात समावेश अनेक फायदे होतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्या प्राचीन वैद्यकीय पद्धतीत आयुर्वेदात या भाजीला विशेष महत्व आहे. या भाजीचे पाने कात्री सारखे असतात. हरभरा, मेथी आणि पालक सोबत चाकवतची भाजी अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. हिवाळ्यात या हिरव्या भाज्यांची मागणी वाढते. विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार या भाजीचा आहारात समावेश करू शकता. रायता बनवा, पराठा किंवा तुमच्या आवडत्या डाळीत घालून खा.

पोषक घटक

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की १००ग्रॅम हिरव्या भाज्यांमध्ये ४ ग्रॅम प्रोटीन, ७ ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि ०.८ ग्रॅम फॅट असते. चाकवताच्या भाजीत जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, फायबर, अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् आणि पाणी असते त्यामुळे हे शरीरात निर्जलीकरण होऊ देत नाही.

चाकवताची खाण्याचे फायदे 

हिवाळ्यात रिकाम्या पोटी राहू नये असे आयुर्वेदात सांगितले आहे. हिवाळ्यात भूक जास्त लागते त्यामुळे लोक भरपूर जेवतात आणि नंतर वजन वाढल्याची तक्रार करतात असे अनेकदा पाहायला मिळते.  त्यामुळे चाकवतची भाजी या चिंतेतून दिलासा देते. या भाजीत फायबर असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते आणि पोटही भरल्या सारखे वाटते. हिवाळ्यात ही भाजी खाल्याने वजन नियंत्रणात राहते.

या भाजीमध्ये भरपूर फायबर असल्यामुळे आतड्यांमध्ये साचलेली घाण देखील साफ करते. या भाजीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेट राहते आणि पचनक्रियाही चांगली राहते.  या भाजीमध्ये भरपूर फायबर आणि पाणी असल्यामुळे बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि इतर पाचन समस्या दूर होते. केसांची वाढ होण्यासाठी आणि शरीरातील पेशी वाढण्यासाठी चाकवतची भाजी नक्की खावी.

या पालेभाज्या गुणांनी समृद्ध असतात आणि त्यात कॅल्शियम आणि फॉस्फरस देखील असतात जे हाडे मजबूत करतात. या भाज्या खाल्याने हाडे आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.  या भाजीचा १०० मिली रस रोज प्यायल्यास यकृत निरोगी होते आणि महिनाभर सतत सेवन केल्यास हिमोग्लोबिनही वाढते. त्यामुळेही भाजी आठवडयातून दोनदा तरी खावी.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Edited by - अर्चना चव्हाण

Maharashtra News Live Update: कल्याणहून जाणारी लोकल वाहतूक विस्कळीत

गावरान स्टाईलमध्ये बनवा हिरव्या माठाची भाजी, रेसिपी आहे एकदम सोपी

Health Care: वजन कमी करायचंय? मग रोज संध्याकाळी ७ वाजता जेवण्याची सवय लावा; मिळतील 'हे' फायदे

Parenting Tips : मुलं सतत मोबाईलमध्ये गुंतलेली असतात? स्क्रीनटाईम कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय

धक्कादायक पण दुर्मिळ घटना! जन्मत: दात असलेलं 1 किलोचं बाळ! मुंबईत डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT