Aliens Body saam tv
लाईफस्टाईल

Alien: नासाच्या सिक्रेट लॅबमध्ये ठेवलाय एलियन्सचा मृतदेह; प्रसिद्ध जादूगाराचा दावा, पाहा काय केला खुलासा

Aliens Body: एलियंसबाबत तज्ज्ञांमध्ये एकमत पाहायला मिळत नाही. अशातच एका प्रसिद्ध जादूगाराने एलियंसच्या मृतदेहाबाबत मोठा खुलासा केला आहे. यामध्ये त्यांनी काय दावा केला आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

एलियंस आहेत की नाहीत यावर तज्ज्ञांचं देखील दुमत पाहायला मिळतं. अमेरिकेत अनेकांनी एलियंसच्या अस्तित्वाबाबत प्रश्न उपस्थित केलंय. काहीचं म्हणणं आहे एलियंस असतात मात्र काहींच्या म्हणण्यानुसार, एलियंस असण्याबाबत कोणतेही पुरावे नाहीत. मात्र एका जादूगाराच्या दाव्याने संपूर्ण जग हैराण आहे.

प्रसिद्ध जादूगर उरी गेलर यांनी दावा केला आहे की, त्यांनी एलियंसचा मृतदेह पाहिला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एलियंस दिसायला माणसांसारखेच असतात. मात्र त्याचं डोकं मोठं असून त्यामानाने शरीर बारीक असतं.

नासाच्या लॅबमध्ये ठेवण्यात आला मृतदेह

जवळपास ७८ वर्षांपासून युरी गेलर यांना त्यांच्या जादूगारीमुळे प्रसिद्धी मिळाली होती. त्यांनी दावा केला आहे की, नासाच्या लॅबमध्ये एलियंसचा मृतदेह ठेवण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, नासाच्या एका इंजिनीयर आणि एका अंतराळवीर यांना एलियन्सच्या मृतदेहांकडे नेण्यात आलं होतं.

काचेच्या कंटेनरमध्ये ठेवण्यात आलाय मृतदेह

जादूगार उरी गेलर यांनी केलेल्या दाव्यानुसार, नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरच्या खाली एक मोठी रेफ्रिजरेटेड खोली होती ज्यामध्ये मृतदेह होता. हे ठिकाण वॉशिंग्टन डीसीच्या ईशान्येस सुमारे १० किमी अंतरावर आहे. जर्मन रॉकेट इंजिनियर वर्नर ब्राउन आणि चंद्रावर पाऊल ठेवणारे सहावे अंतराळवीर एडगर मिशेल यांना तळाशी असलेल्या एका काँक्रीट इमारतीत घेऊन नेण्यात आलं. त्यांनी काचेच्या डब्यांमध्ये सुमारे आठ मृतदेह पाहिले आहेत. त्यापैकी काही विकृत होते.

उरी यांनी एका टीव्ही मुलाखतीत सांगितलं की, 'आत जाण्यापूर्वी, ब्राउनने मला अंटार्क्टिक स्टाईलचा उबदार कोट घालण्यास सांगितलं. ज्यावर गोलाकार निळा नासाचा लोगो होता. मी आत गेलो तेव्हा हॉस्पिटलसारखा वास येत होता. यावेळी मोठ्या काचेच्या आत एक मृतदेह होता हे मला दिसत होतं. हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं.

एलियंसना ज्या पारदर्शक कंटेनरमध्ये ठेवण्यात आलेलं ते जाड काचेचे बनलेले होते. या पेट्यांच्या बाजू आणि कोपरे बर्फाने झाकलेले होते. त्याच्या आत मोठे डोके असलेले बारीक आणि कमकुवत दिसणारे एलियन्स होते, असंही त्यांनी सांगितलंय.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT