Garuda Purana: गरूड पुराणानुसार 'अशी' कामं करणाऱ्यांना मिळते नरकात जागा

Garuda Purana Secret: हिंदू धर्मामधील महापुराणात गरूड पुराणाचा समावेश आहे. मुळात गरूड पुराण हा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे. या ग्रथांमध्ये खास मृत्यूनंतरच्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
Garuda Purana
Garuda Puranasaam tv
Published On

हिंदू धर्मामध्ये एकूण १८ महापुराणं आहेत. यामध्ये गरूण पुराणाचा समावेश आहे. गरूड पुराणामध्ये मृत्यू आणि मृत्युनंतरच्या जीवनाच्या विविध गोष्टींवर अधिक माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सर्व गोष्टींचं तपशीलावर वर्णनही करण्यात आलं आहे.

गरुड पुराणामध्ये मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास, कर्मांचं फळ आणि स्वर्ग आणि नरक या सर्व गोष्टींबाबत माहिती देण्यात आली आहे. शिवाय या ग्रंथांमध्ये कोणत्या व्यक्ती नरकात जाऊ शकतात, हे देखील सांगण्यात आलंय. गरुड पुराणानुसार, अशा लोकांबद्दल जाणून घेऊया ज्यांना नरकात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

Garuda Purana
Mysterious Story: 'या' भागात एलियन्सचा कहर! लोकांना किडनॅप करत असल्याचा स्थानिकांचा दावा

अशा लोकांना नरकात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही

पुराणातील ग्रंथांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, माणूस फक्त त्याच्या कर्माची फळ भोगत असतो. तुमच्या जीवनात तुम्ही जी काही कर्म केलीत त्याचं तुम्हाला फळ मृत्यूनंतर मिळतं. जे चांगले कर्म करतात त्यांना चांगलं फळ मिळतं आणि जे वाईट कर्म करतात त्यांना नरकात स्थान मिळतं.

  • स्वर्गात स्थान मिळावं यासाठी लोकं दानधर्म करतात. मात्र जे लोक दानधर्माच्या नावाखाली दिखावा करतात त्यांनाही नरकात जावं लागतं.

  • त्याचप्रमाणे र्माची टीका करणाऱ्यांना नरकात जागा मिळते, असंही ग्रंथामध्ये म्हटलं गेलंय.

  • गरुड पुराणानुसार, ज्या व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तींना धोका देतात किंवा त्यांचा विश्वासघात करतात, आयुष्यात फसवणूक करतात त्यांना नरकात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

Garuda Purana
Garuda Purana Secret: मृत्यूपूर्वी १ तास अगोदर व्यक्तीला दिसतात 'या' गोष्टी; गरूड पुराणात केलाय उल्लेख
  • ज्या व्यक्ती खोटं बोलतात, देवाच्या नावाखाली खोटी शपथ घेतात त्यांना नरकात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असं गरूड पुराणात म्हटलंय.

  • महिलांवर अत्याचार, शोषण किंवा महिलांचा अत्याचार करणाऱ्या व्यक्तींना नरकात स्थान मिळतं.

Garuda Purana
Garuda Purana katha: मृत्यूपूर्वी व्यक्तीला दिसून येतात 'या' गोष्टी; गरूड पुराणात दिलंय वर्णन

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com