Age Wise Sleep Chart saam tv
लाईफस्टाईल

Age Wise Sleep Chart: कोणत्या वयात किती तास झोपावं? वाचा तज्ज्ञांचे मत

Sleep Chart: वयानुसार शरीराला वेगवेगळी झोप गरजेची असते. नवजात बाळांपासून ते वृद्धांपर्यंत किती तास झोप घ्यावी, झोपेचे फायदे आणि तज्ञांनी दिलेले झोप मार्गदर्शन येथे जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

  • वयानुसार शरीराच्या झोपेची गरज वेगळी असते.

  • पुरेशी झोप घेतल्याने मेंदू, इम्युनिटी आणि हार्मोन्स संतुलित राहतात.

  • मुलांना आणि किशोरांना प्रौढांपेक्षा जास्त झोप आवश्यक असते.

शरीराला रिचार्ज करण्यासाठी आणि मनाला शांत ठेवण्यासाठी झोप ही अत्यंत महत्त्वाची असते. दिवसभराच्या थकव्यापासून मुक्त होण्यासाठी आणि मेंदूला रिस्टार्ट करण्यासाठी रात्रीची झोप आवश्यक असते. झोप ही फक्त आराम देत नाहीतर शरीराची पुन्हा नैसर्गिक प्रक्रिया करून काम करायला सुरुवात करते. झोपेच्या वेळेस मेंदू दिवसभर जमा झालेल्या माहितीला व्यवस्थित करतो, तर शरीरातील हार्मोन्स, स्नायू आणि इम्यून सिस्टमची रिपेअरिंग होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते.

तज्ज्ञांच्या मते, रात्री सुमारे 7 तासांची झोप घेतल्यास इम्युनिटी वाढते, मेंदू चांगला कार्य करतो, फोकस वाढतो आणि मूडही फ्रेश राहतो. नीट झोपल्याने हार्ट हेल्थ आणि मेटाबॉलिझमही सुधारतो. नॅशनल स्लीप फाउंडेशन (NSF) आणि विविध आरोग्य संशोधन संस्थांच्या मते, प्रत्येक वयोगटानुसार झोपेची गरज वेगळी असते. नवजात शिशुपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत झोपेचे प्रमाण शरीराच्या बदलत्या गरजेनुसार ठरते.

नवजात बाळांना दिवसभरात 14 ते 17 तास झोपेची गरज असते. चार ते अकरा महिन्यांच्या बाळांना 12 ते 15 तास झोप गरजेची असते. ज्यात दिवसभरातल्या लहान-लहान झोपेचाही समावेश होतो. एक ते दोन वर्षांच्या मुलांना 11 ते 14 तास झोप आवश्यक असते. तीन ते पाच वर्षांच्या प्री-स्कूल मुलांसाठी 10 ते 13 तास झोप उत्तम मानली जाते. सहा ते बारा वर्षांच्या स्कूल-गटातील मुलांना 9 ते 11 तास झोप आवश्यक असते.

किशोरवयीन म्हणजेच 13 ते 18 वर्षांच्या मुला-मुलींना दररोज 8 ते 10 तास झोप घेतली पाहिजे. तर 18 ते 25 आणि 26 ते 64 वर्षांच्या प्रौढ व्यक्तींना 7 ते 9 तास झोप पुरेशी ठरते. 65 वर्षांवरील वृद्ध व्यक्तींना 7 ते 8 तासांची झोप योग्य मानली जाते. कोणत्याही वयोगटातील व्यक्तींनी आपल्या झोपेची वेळ नियमित ठेवणे आणि आवश्यक तास झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

Actress Assault: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रेल्वे स्टेशनवर घृणास्पद कृत्य; दुःख व्यक्त करत म्हणाली, मला जीवन संपवावं...

Parbhani Accident: कीर्तनाहून येताना भयंकर अपघात, ३ वारकर्‍यांचा जागीच मृत्यू, दत्ता महाराज मुडेकरांचं निधन

Beetroot Face Cream: घरच्या घरी बनवा बीटरूट फेस क्रिम, आठवडाभरात चेहऱ्यावर दिसेल गुलाबी चमक

Vitamins: वेळीच व्हा सावध! व्हिटॅमिन्सच्या गोळ्या रोज घेणं ठरेल घातक; डॉक्टरांनी सांगितल्या 'या' मर्यादा, आताच घ्या जाणून

SCROLL FOR NEXT