Sakshi Sunil Jadhav
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत चुकीचे खाणे, ताणतणाव आणि झोपेचा अभाव यामुळे डायबेटीस, पोटाशी संबंधित त्रास आणि लिव्हरवरील ताण वाढू लागला आहे. पण आपल्या आजूबाजूला अशा अनेक नैसर्गिक औषधी वनस्पती आहेत ज्या नियमित सेवन केल्यास अनेक आजार दूर ठेवता येतात.
कडुलिंबातील कडूपणामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहते. हे शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते.
कडुलिंबातील अँटीऑक्सिडंट्स लिव्हरमधील विषारी पदार्थ बाहेर काढतात. त्यामुळे लिव्हर स्वच्छ राहते आणि फॅटी लिव्हरचा धोका कमी होतो.
रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्याने पचनशक्ती बलवान होते. अॅसिडिटी, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता यांना आराम मिळतो.
कडुलिंब शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते. चरबी जळण्याची प्रक्रिया जलद होते, त्यामुळे वजन कमी होण्यात मदत होते.
कडुलिंबामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे सांधेदुखी, सूज आणि वेदना कमी करतात.
कडुलिंब रक्त शुद्ध करते. त्यामुळे पिंपल्स, अॅलर्जी, कोंडा, त्वचेवरील रॅशेस कमी होतात. याने त्वचा स्वच्छ आणि ग्लोइंग होते.
दररोज काही पानं खाल्ल्याने शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो.
कडुलिंबातील घटक जंतू निर्माण होणे थांबवतात. पोटातील संसर्ग आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून दूर ठेवतात.